उत्तर मध्ययुगीन राज्ये....
गुप्त साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर व दक्षिण भारतात अनेक हिंदू साम्राज्ये उदयास आली. उत्तरेस प्रतिहार,पाल,वर्धन,गहडवाल इत्यादी तर दक्षिणेस राष्ट्रकूट,होयसळ,पांड्य,चेर,कदंब,यादव इत्यादी साम्राज्ये होऊन गेली.
_________________________________
मुसलमानी आक्रमणे व राज्ये संपादन करा
Gol Gumbaz at Bijapur, has the second largest pre-modern dome in the world after the Byzantine Hagia Sophia.
मुख्य पान: Islamic Empires in India
अरबस्तानात सहाव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी स्पेन, उत्तर अफ्रिका, तुर्कस्तान ते इराण बलुचिस्तानपर्यंत भाग इस्लामय करून टाकला होता. उमय्यद खलीफाच्या काळात बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व भारतात इस्लामी राज्याची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात इस्लामी आक्रमकांना प्रतिहारीं कडून मोठ्या पराभवाची चव चाखावी लागली त्यामुळे इस्लामी राज्याचा पूर्वेकडचा विस्तार थांबला. परंतु भारताशेजारील इराण तोवर पूर्णपणे इस्लाममय झाला होता. शेजारील (भारत) संपन्न व गैर इस्लामी राज्य आक्रमणासाठी खूणवत होते. दहाव्या शतकात इस्लामी आक्रमणांची व्याप्ति वाढली व भारतात लहान इस्लामी सल्तनते तयार होउ लागली. या आक्रमणांच्या आगोदरही भारतात अरबी व्यापार्यामार्फत इस्लाम पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात पोहोचला होता. सुरुवातीची इस्लामी आक्रमणे प्रामुख्याने लूटीवर आधारित होती. या लूटींचे मुख्य लक्ष्य मंदिरे व संपन्न शहरे होती. गझनीचा महमूदने भारतावर लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या.
दिल्ली सल्तनत संपादन करा
कुतुबमिनार
मुख्य पान: दिल्ली सल्तनत
१२ व्या शतकात पृथ्वीराज चौहानचा मोहम्मद घौरीने पराभव केला व भारतात अधीकृतरित्या इस्लामी राजवट सूरु झाली. मोहम्मद घौरीने आपल्या तुर्की गुलामांना राज्यकर्ते बनवले व उत्तर भारतावर गुलाम घराण्याची सत्ता राहिली. भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट आली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत इस्लामी सरमिसळ या काळात सुरू झाली. त्यामुळे अनेक सामाजिक बदल भारतात घडून आले. भारतीय स्थापत्य शैली, संगीत व भाषेवर खूप मोठा इस्लामी प्रभाव दिसून येतो तो या काळात रुजला होता. दिल्ली सल्तनतीत कोणत्याही घराण्याला मोठा काळ प्रभुत्व गाजवता आले नाही. एकूण ३०० वर्षांच्या राजवटीत ५ ते ६ घराण्यांनी दिल्ली सल्तनतीत राज्ये केली. ही सर्व घराणी प्रामुख्याने इस्लामी होती. खिल्जी घराण्याने भारतभर मोहिमा काढून भारताच्या अनेक हिंदू राज्ये नष्ट केली. तसेच काही राज्यकर्त्यांनी लोकोपयोगी कामे करून चांगला हातभार लावला. शेरशहा सूरी ने बांधलेला कलकत्ता काबूल रस्ता आजही वापरात आहे. दिल्ली सल्तनतीने भारताला मंगोल आक्रमकांपासून थोडाफार बचाव केला. बहुतेक दिल्ली सल्तनतील घराण्यांचे लष्करी बळ मंगोल आक्रमकांचा सामना करण्यात गेले. तरीही तैमूरलंगच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यात दिल्ली सल्तनतीला अपयश आले.
१४ व्या शतकाच्या शेवटी १३९८ मध्ये उत्तरभारतावर कझाकस्तानातील तैमूरलंग या मंगोल आक्रमकाने जबरदस्त आक्रमण केले. तैमूरलंगच्या आक्रमणापुढे तुघलकांचा मोठा पराभव झाला व १७ डिसेंबर १३९८ रोजी दिल्ली तैमूरच्या हाती पडली. तैमूरने दिल्लीमध्ये जाळपोळ लूटमार आरंभली व मोठ्या प्रमाणावर हिंदूची कत्तल केली. हे तत्कालीन इतिहासातील मोठे मानवी शिरकाण समजले जाते.त्याच्या सैन्यानी कित्येक दिवसांपर्यंत लुट केली व असे मानतात की १ लाख हिंदूंची एका दिवसात सामुहिक हत्या करण्यात आली.तैमूरलंग च्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनतील तुघलक घराण्याची सत्ता संपुष्टात आली. उत्तर भारतात अनेक लहान सहान इस्लामी नवाबी संस्थाने उदयास आली. अवध, लखनौ, बंगाल येथे अशी सस्थांने होती. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिणेतील विजयनगर साम्राज्य संपुष्टात आले व दक्षिण भारतात अनेक शाही उदयास आल्या. अहमदनगर येथे निजाम शाही, विजापूर येथील अदिलशाही व गोळकोंडा येथील कुतुबशाही. जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राजवट सूरु झाली. १५२६ मध्ये बाबर या कझाक आक्रमकाने दिल्ली सल्तनतीचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनत संपुष्टात आणली व मुघल साम्राज्याचा पाया घातला.
मुघल साम्राज्य संपादन करा
मुघल साम्राज्याचा १७ व्या शतकातील विस्तार
ताजमहाल,मुघल स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण
मुख्य पान: मुघल साम्राज्य
हेसुद्धा पाहा: बाबर, हूमायूं, अकबर, जहांगीर, शाहजहॉं, आणि औरंगजेब
इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले.मुघल साम्राज्याने १७ व्या शतकात भारताच्या बहुतेक भागावर राज्य केले व १७०७ नंतर औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर या साम्राज्याची घसरण चालू झाली सरतेशेवटी १८५७ पर्यंत एका लहान संस्थानिकाचा आकारा पर्यंत मर्यादित राहून टिकली. १८५७ मध्ये ब्रिटीशांनी मुघल राज्य खालसा करून टाकले. या काळात उत्तर भारतात मोगलांचे व दक्षिण भारतात विविध शाहींची राज्ये होती. १६८८ पर्यंत मोघलांच्या राज्याचा विस्तार प्राचीन मौर्य साम्राज्याच्या विस्ताराऐवढा होता. दिल्ली सल्तनतींच्या तुलनेत मुघल साम्राज्याने धार्मिक सलोखा ठेवला. यात सम्राट अकबरने पुढाकार घेतला होता. त्याने स्वता:ही दिन-ए-इलाही हा धर्मही चालू केला होता. तसेच हिंदूंवर लादला जाणारा झिजीया करही माफ करून टाकला होता. मोगलांनी भारतीय स्थापत्यामध्ये परिवर्तन आणले व आजच्या भारतीय स्थापत्याची ओळख प्रामुख्याने मुघली स्थापत्यावरून होते. जगप्रसिद्ध ताजमहाल मोघल सम्राट शहाजहॉंने बांधला तसेच फत्तेपूर सिक्री हे पूर्ण शहर वसवले. दिल्ली व आग्रामधील मधील बहुतेक जुन्या वास्तू या मोघल स्थापत्याची ओळख करून देतात. हिंदूच्या बरोबर सलोखा वाढवला तरीही शाहजहॉं व औरंगजेबच्या काळात हा धार्मिक सलोखा खालवला. औरंगजेबने हिंदूंविषयी दाखवलेल्या कडवट धोरणांमुळे मराठे, राजपूत व शीख दुखावले व मुघल राज्याविरुद्ध बंडाळी वाढली व मुघल साम्राज्याचे पतन होण्यास कारणीभूत ठरले. खासकरून शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याकडून मोठा प्रतिकार झाला. औरंगजेबने आपल्या आयुष्याची शेवटची २७ वर्षे मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यात घालवली जे साध्य झाले नाही. औरंगजेबच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार वाढला व मोघलांचा क्षीण झाला व दिल्ली आग्रापुरते त्यांचे राज्य मर्यादित राहिले हा काळ मुघलांच्या दृष्टीने खूपच अस्थैर्याचा राहिला. ५० वर्षांच्या काळात १७ मुघल राजे होऊन गेले.
No comments:
Post a Comment