नेहमीप्रमाणे कालचा ग्रुप C चा पेपर One Liner आणि Factual होता.
Difficulty level म्हणाल तर जास्त सोपा पण नाही आणि जास्त अवघड पण नाही.
👉म्हणजेच Easy to Moderate level चा म्हणता येईल.
👉 पेपर मध्ये Polity, History, Geography आणि Economy तुलनेने सोपे म्हणता येतील म्हणजेच या विषयांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येऊ शकत होते.
👉 जसे Polity नेहमीप्रमाणेच विचारले होते. महाराष्ट्र भूगोलाचे प्रश्न त्याच दर्जाचे होते. Economy मध्ये 3-4 प्रश्न संकल्पनात्मक होते ज्याला वेळ देणे आवश्यक होते. बाकी इतिहासाचा ट्रेंड आयोगाने 2020 पासून सोपा ठेवलेला आहे त्याच level चे प्रश्न होते..
👉 पण विज्ञान, Current आणि गणित- बुद्धिमत्ता मात्र नेहमीप्रमाणे Cut off deciding ठरतील.. म्हणजेच या तीन विषयात जे लोक स्कोर करतील ते नक्कीच लीड घेतील.. गणित- बुद्धिमत्ता खूप scoring होत. विज्ञान नेहमीप्रमाणे out of box आणि हातात न सापडणारे प्रश्न होते पण तरीपण 7-8 प्रश्न आपल्या अभ्यासाच्या आणि logic च्या जोरावर सुटू शकणारे होते..
👉 Current मात्र अति Factual आणि non Conventional म्हणता येईल. जगाचे तसेच भारताचे न वाचलेल्या भागावर प्रश्न विचारले होते. So current मध्ये 6-7 पण स्कोर राहायला पाहिजेत.
So अश्या प्रकारे Combine गट क मध्ये आयोगाने पाठीमागचाच ट्रेंड Continue केला अस म्हणता येईल.
कोणताही पेपर झाल्या झाल्या सोपाच वाटत असतो पण answer key आल्यावर खऱ्या अर्थाने आपण परफॉर्मन्स सांगू शकतो.
त्यामुळे पुढचे 1-2 दिवस निवांत राहा आणि पुढच्या परीक्षांच्या दृष्टीकोनातून नियोजन करा.
सर्वांना शुभेच्छा 💐💐
No comments:
Post a Comment