भूगोल
भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द -Geo आणि Graphiya या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा अर्थ वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो.
भूगोलशास्रद्य चार पारंपारिक विचारातून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात.
1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया
2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास
3. मानवआणि पृथ्वी यांचा सहसंबंध
4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो. पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि भू-वैज्ञानिक यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्रामध्ये आणि नकाशातंत्रात पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व अवकाश यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, वनस्पती तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो. एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे म्हणजे भूगोल नव्हे.आजचा जगामध्ये भूगोल हा समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम करत असलेले दिसून येते .
दोन मुख्य उपशाखा संपादन करा
भूगोल हे शास्त्र असून त्याच्या मानवी भूगोल व भौतिक किवा प्राकृतिक भूगोल अशा दोन मुख्य उपशाखा आहेत. उल्लेख दोन्ही उपशाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण यांच्या निर्मितीचा अभ्यास होतो. यातील मानवी भूगोलाच्या उपशाखेचा मानवी दृष्टिकोनातून मानवाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव व मानवाचे पृथ्वीवरील महत्त्व यांचा अभ्यास करणे हा उद्देश आहे; तर भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, वातावरण, जलावरण, वनस्पती, जीवन, मृदा किवा माती, जल आणि भूरचना हे सर्व कशाप्रकारे एकमेकांवर प्रभाव टाकतात यांचा अभ्यास केला जातो. या दोन्ही शाखांचा अभ्यास करतांना पर्यावरणीय भूगोल या तिसऱ्याच शाखेची निर्मिती झाली. या शाखेत या दोन्ही शाखांचा एकमेकांवर पडणाऱ्या प्रभावातून निसर्ग व मानवाचा संबध लक्षात येतो.
No comments:
Post a Comment