महिला कल्याणासाठीचे कायदे
हुंडा प्रतिबंधक कायदा : १९६१'च्या या कायद्यान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देणे गुन्हे आहेत. हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी भारतीय दंड संहितेमधे ३०४ (ख) आणि ४९८ (क) ही नवीन कलमे अंतर्भूत आहेत.
महिला संरक्षण कायदा : कौटुंबिक छळ (महिला संरक्षण) प्रतिबंधक कायदा स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आथिर्क व शारीरिक संरक्षण देतो. हा कायदा फक्त पुरुषांविरुद्धच लागू होतो. यात अंतरिम आदेश देणे, नुकसान भरपाई देणे, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, भागीदारीच्या घरात राहण्याचा अधिकार, कायदेशीर व वैद्यकीय मदत देण्याची तरतूदही आहे.
अश्लीलताविरोधी कायदा : भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ ते २९४ मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जाहिराती, पुस्तकं, चित्र आदी माध्यमांतून महिलांची विटंबना करणाऱ्या चित्र किंवा लेखनातून 'अश्लीलता सादर करणाऱ्याविरोधी कायदा १९८७'नुसार वॉरण्टशिवाय अटक करण्याचा अधिकारही आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा : बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी 'बालविवाह प्रतिबंधक अधिनियम (शारदा अॅक्ट)' १९८७ मध्ये सुधारणा झाल्या आहेत. लग्नाच्या वेळी मुलींचे वय किमान १८ आणि मुलाचे वय २१ वर्षाहून कमी असल्यास शिक्षेची तरतूद आहे. हा कायदा सर्व जातिधर्माच्या लोकांना सारखाच लागू आहे.
कौटुंबिक न्यायालय कायदा : दाम्पत्य व कौटुंबिक कलहाची प्रकरणे एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी कौटुंबिक अधिनियम १९८४ लागू करण्यात आला आहे. कुटुंब न्यायालय नसल्यास तिथल्या जिल्हा कोर्टांना कुटुंब न्यायालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
छेडछाड करणे गुन्हा : स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रांना हात घालणे अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता ३५४ खाली शिक्षेची तरतूद आहे. तसेच, छेडछाड केल्याबदल भारतीय दंड संहिता कलम ५०९ अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल करता येते.
मुलावर हक्क : एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाल्यास तिच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना ती स्वत:जवळ ठेवू शकते. मात्र पाच वर्षांहून अधिक वयाच्या मुलांच्या बाबतीत कोर्टाचा निर्णयच बांधील असतो.
समान वेतन कायदा : समान वेतन कायद्यानुसार एकाच कामासाठी स्त्री व पुरुष दोघांना समान वेतन मिळाले पाहिजे. विशिष्ट कार्यक्षेत्रातील नोकऱ्या सोडता अन्य ठिकाणी स्त्रियांना रात्र पाळीला कामाला बोलावता येत नाही.
लैंगिक गुन्हे : लैंगिक गुन्ह्यासंबंधात भारतीय दंडसंहिता कलम ३७५ व ३७३ अनुसार कडक शिक्षा देण्यात येतात. लैंगिक प्रकरणाची सुनावणी कोर्टाच्या बंद खोलीत होते.
हिंदू उत्तराधिकार : १९५६मध्ये निर्माण झालेल्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना संपत्तीमध्ये व्यापक अधिकार देण्यात आले असून स्त्रीधनाचा उपभोग घेण्याचा आणि ते धन खर्च करण्याचा अनिर्बंध अधिकार स्त्रीला मिळाला आहे. हिंदू स्त्रीला एकत्र कुटुंबाच्या संपत्तीतसुद्धा वाटणी मागता येते. स्त्री धन मिळावे म्हणून स्त्री कोर्टात खटला दाखल करू शकते. स्त्रीला मुलाप्रमाणेच वडिलोपाजिर्त संपत्तीमध्येही समान हक्क दिला गेलाय.
हिंदू विवाह कायदा : भारतीय दंड संहिता कलम १२५ अनुसार स्त्रीला पोटगीची मागणी करण्याचा हक्क आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ कलम २५ नुसार अर्ज दाखल केल्यानंतर कोर्ट पोटगीची रक्कम देण्याचे आदेश देते. पती-पत्नीच्या वादामधे निकाल लागेपर्यंतच्या मधल्या काळातसुद्धा पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी अंतरिम पोटगी रक्कम देण्याची तरतूद कायद्यात आहे.
प्रसूती सुविधा कायदा : नोकरीपेशातील स्त्रियांसाठी बाळंतपणाची आणि नवजात बाळाची देखभाल करण्यासाठी रजेची तरतूद असून त्या काळात स्त्रीला विशिष्ट दिवसाची भर पगारी रजा मिळते. मात्र कायद्यानुसार ती रजा व इतर फायदे फक्त दोन बाळंतपणासाठी असतात. गर्भपात झाल्यावरही स्त्रीला भर पगारी रजा मिळण्याची तरतूद कायद्यात आहे.
विशेष विवाह अधिनियम : विशेष विवाह अधिनियम १९५४च्या तरतुदीनुसार मानसिकदृष्ट्या सक्षम आणि १८ वषेर् पूर्ण झालेली स्त्री प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह स्वत:च्या इच्छेनुसार करू शकते. या विवाहाची नोंदणी करणे आवश्यक असून पुरुषाचे वय २१ वर्षापेक्षा अधिक असावे.
गर्भलिंग चाचणी : स्त्री भूण हत्या रोखणे व गर्भांचे लिंग जाणून घेण्याच्या तंत्राचा दुरुपयोग करणे यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदान आणि तंत्रज्ञान विनिमय व दुरुपयोग निवारण अधिनियम १९९४ आहे.
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ संर्दभात आयोगाने विचारलेले प्रश्न 👇🏼
प्र . १ . कोणत्या दजचे पोलीस अधिकारी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून नियुक्त केले जातात ? ( PSI मुख्य २०१२ )
१ ) पोलीस निरीक्षक
२ ) अधिक्षक ✅
३ ) हेड कॉन्स्टेबल
४ ) आयुक्त
प्र.२ . मुंबई पोलीस कायदा १९५१ अंतर्गत खालीलपैकी कोणत्या कृत्यांसाठी कलम १४५ प्रमाणे ३ महिनेपर्यंत तुरुंगवास आणि / किंवा रु . १00 पर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद आहे ? ( PSI मुख्य २०१२ )
१ ) भित्रेपणा दाखवणे
२ ) परवानगीशिवाय गैरहजर राहणे
३ ) खोटी कारणे देऊन राजीनामा देणे
४ ) वरीलपैकी सर्व ✅
प्र.३ .मुंबई पोलीस कायदयाच्या कलम १३३ खाली खालीलपैकी कोणते कृत्य केल्यास शिक्षा होते ?( PSI मुख्य २०१२ )
१ ) राखून ठेवलेल्या जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रेताची व्यवस्था लावल्यास.✅
२ ) रस्त्यावर अडथळा उभारण्यासंबंधी
३) गायन , आवाज किंवा गोंगाट चालू ठेवलेस
४ ) सार्वजनिक अव्यवस्था उदयुक्त करणारे कृत्य
प्र .४ .मुंबई पोलीस अधिनियम कलम ११६ नुसार खालीलपैकी कोणते वर्तन करू नये ?( PSI मुख्य २०१२ )
१ ) जाण्या - येणा - या व्यक्तीस त्रास होईल अशा रीतीने धुंकणे वा धूळ , राख , कचरा टाकता कामा नये .
२ ) शांततेचा भंग व्हावा या उद्देशाने धमकीचे , शिवीगाळीचे शब्द वापरू नये ,
३ ) रस्त्यात व सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विर्सजन करून उपद्रव करता कामा नये .
४ ) न्यायालय , पोलीसठाण्यात , सरकारी इमारतीत लावलेल्या नोटीशीचे उल्लंघन करून सिगारेट किवा तंबाखू ओढता किंवा थुकता कामा नये .✅
प्र .५ .पोलीसांचे वाजवी आदेश पाळण्याचे लोकांवर बंधन आहे .असे आदेश न पाळल्यास खालीलपैकी कोणापुढे नेता येईल ? ( PSI मुख्य २०१२)
१) अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश
२ ) पोलीस अधिक्षक
३ ) जिल्हा दंडाधिकारी ✅
४ ) पोलीस निरीक्षक
प्र.६ , मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ६० नुसार खालीलपेठ कोणत्या कलमांच्या अन्वये केलेल्या आदेशाविरुद्ध राज्यसरकारकडे अपील करता येईल ?( PSI मुख्य २०१२ )
१) कलम ५५ - ५६ - ५७ - ५७ अ ✅
२) कलम ४० - ४५ - ५० - ५५
३ ) कलम ५१ - ५२ - ५३ ( अ ) — ५४
४ ) कलम ५५ - ५६ - ५७ ( अ ) - ५८
प्र , ७ , मुंबई पोलीस कायदा १९५१ अंतर्गत ' ' गुरे , ढोरे " सच्याखाली ( व्याख्येप्रमाणे ) खालीलपैकी कोणती जनावरे येत नाहीत? ( PSI मुख्य २०१२ )
१ ) उंट
२ ) हत्ती
३ ) माकडे ✅
४ ) घोड़े
भारतातील प्रमुख खिंडी
■ काराकोरम दर्रा - जम्मू कश्मीर
■ जोजिला दर्रा - जम्मू कश्मीर
■ पीरपंजाल दर्रा - जम्मू कश्मीर
■ बनिहाल दर्रा - जम्मू कश्मीर
■ बुर्जिल दर्रा - जम्मू कश्मीर
■ शिपकीला दर्रा - हिमाचल प्रदेश
■ रोहतांग दर्रा - हिमाचल प्रदेश
■ बड़ालाचा दर्रा - हिमाचल प्रदेश
■ लिपुलेख दर्रा - उत्तराखंड
■ माना दर्रा - उत्तराखंड
■ नीति दर्रा - उत्तराखंड
■ नाथूला दर्रा - सिक्किम
■ जैलेप्लो दर्रा - सिक्किम
■ बोम्डिला दर्रा - अरुणाचल प्रदेश
■ यांग्याप दर्रा - अरुणाचल प्रदेश
■ दिफू दर्रा - अरुणाचल प्रदेश
■ तुजु दर्रा - मणिपुर
No comments:
Post a Comment