भारत - पाकिस्तान फाळणी
....
धार्मिक आधारावर पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिमबहुल राष्ट्र अस्तित्वात आले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला व दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. पाकिस्तान हे राष्ट्र पश्चिम (आजचा पाकिस्तान) व पूर्व अशा भागात विभागले होते. इ.स. १९७१साली भारताच्या पाठिंब्याने पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला व त्याचे बांगलादेश असे नामकरण झाले.
भारताची फाळणी
भारत व पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करणारी
ऐतिहासिक घटना
अखंड भारताची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले.
British Indian Empire 1909 Imperial Gazetteer of India.jpg
१९४७ साली ब्रिटिश साम्राज्याचा भारतीय उपखंड तीन (पुढे चार) राष्ट्रांत विभाजित झाला. यात आजचा भारत, ब्रह्मदेश, (म्यानमार, श्रीलंका, व पाकिस्तान (पूर्व पाकिस्तान व आजचा बांग्लादेश आदींचा समावेश होता.)
फाळणीपूर्वीसंपादन करा
फाळणीबाधित लोक पंजाबमधील एका ट्रेनवर
फाळणीबाधित लोक
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात "थेट कृतिदिना"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.
परिणाम
हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले.
नवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून १९७१ साली बांग्लादेश उदयाला आला.
भारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदू-मुस्लिमांत भीषण दंगे घडले.
भारत व पाकिस्तानमध्ये चारदा युद्ध झाले.
जम्मू व काश्मीरमधील फुटीरतावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद जन्माला आले.
ईशान्य भारतामधील फुटीर चळवळी
उर्दू भाषिकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे जन्माला आलेले मुहाजिर आंदोलन
भारताच्या फाळणीवरील मराठी पुस्तके संपादन करा
द अदर साईड ऑफ सायलेन्स (मूळ इंग्रजी, लेखिका - उर्वशी बुटालिया; मराठी अनुवाद - नारायण प्रल्हाद आवटी)
'पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया' (प्रथमावृत्ती: थॉट्स ऑन पाकिस्तान; १९४०); लेखकः डॉ. बाबासाहेब आंबेडकर
No comments:
Post a Comment