भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती
भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती : कलम ७५(१) नुसार पंतप्रधानची तरतूद केली आहे. पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्र्पतींद्वारे होते.
पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे घटक असतात.
भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला आहे. या पद्धतीत ‘घटनात्मक प्रमुख’ व ‘वास्तव कार्यकारी प्रमुख’ असे दोन प्रमुख कार्यरत असतात.
राष्ट्रपती हे नामधारी घटनात्मक प्रमुख (de jure executive) तसेच राष्ट्रप्रमुख (Head of the State) असतात.
पंतप्रधान हेच वास्तव कार्यकारी प्रमुख (de facto executive) तसेच शासन प्रमुख (Head of the Government) असतात.
संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख ‘प्रधानमंत्री’ (Prime Minister) असाच आहे हे नेहमीच लक्षात ठेवावे.
प्रमुख असे दोन प्रमुख कार्यरत असतात.
निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करायची हे ठरवतो. त्याच पक्षातील प्रधानमंत्र्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचा प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होतो. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. नसल्यास त्यांना सहा महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते.
प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते. याचाच अर्थ राज्यकारभाराची वास्तव सत्ता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.
भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती
पंतप्रधानांची निवड (कलम ७५) : लोकसभेत बहमत मिळविणाऱ्या पक्षाच्या नेत्याची राष्ट्रपती पंतप्रधानपदी नेमणूक करतात व पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करतात.
शपथ : पंतप्रधान व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात.
पंतप्रधान म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार हा संसदेचा सदस्य असावा लागतो. नसल्यास सहा महिन्यांच्या आत त्यास संसदेच्या कोणत्याही एका सभागृहावर निवडून येणे क्रमप्राप्त ठरते.
पंतप्रधानांचा कार्यकाल : घटनेने निश्चित केलेला नाही.
लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत राहू शकते.
मुदतीपूर्वी राजीनामा द्यायचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा राष्ट्रपतींना सादर करतात.
पंतप्रधानांचे अधिकार व कार्ये :
(१) प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते.
(२) प्रधानमंत्री आपल्या पक्षातील कायदयांच्या विश्वासू सहकाऱ्यांना प्राधान्य देतातच पण त्याचबरोबर तयार प्रशासकीय अनुभव, राज्यकारभाराचे कौशल्य, संसदेच्याकार्यक्षमता, विषयातील तज्ज्ञता यांचाही विचार मंत्री महत्त्वाच्या निवडताना केला जातो.
(३) मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे व्यवहार ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्यात खात्यांचे वाटप निश्चित करण्याचे काम करतात.
(३) प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात.मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमत्र्याच्या अध्यक्षतेखाली होतात.
(४) खातेवाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे, खात्यांमधील परस्पर सहकार्य वाढवणे, खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे अमलबजावणीच
की नाही हे पाहणे, इत्यादी कामे प्रधानमंत्र्यांना पार कायद्याच्या पाडावी लागतात.
(५) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, देशातील जनतेला आश्वस्त करणे, आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्री पार पाडू शकतात.
(६) पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष (प्रमुख) असतात.
(७) मंत्रिमंडळाचा समन्वयक. पंतप्रधानांचा पदावर असताना आकस्मिक मृत्यू झाल्यास मंत्रिमंडळ बरखास्त होते.
(८) पंतप्रधान हे नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
(९) पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा असतो.
(१०) पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवितात. पंतप्रधान हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते मानले जातात.
(११) पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रीमंडळ यांना सांधणारा दुवा आहे. पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खातेवाटपाचे कार्य करतात.
(१२) पंतप्रधान मंत्र्यांना बडतर्फ करण्याची शिफारस करतात. संसदेत सरकारच्या वतीने महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधान करतात.
(१३) पदव्या देणे : व्यक्तींच्या गुणांची कदर करून त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देण्याचा
अधिकार पंतप्रधान व त्यांच्या मंत्रीमंडळास आहे.
No comments:
Post a Comment