1) मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
1) त्, थ्, द्, ध्, न् 2) ट्, ठ्, ड्, ढ्, ण् 3) प्, फ्, ब्, भ्, म् 4) च्, छ्, ज्, झ्, म्
उत्तर :- 2
2) ‘खांदेपालट करणे’ हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1) अन्त्ययात्रा 2) डाव 3) घटका 4) दंड
उत्तर :- 1
3) ‘सहा महिन्यांतून एकदा प्रसिध्द होणारे’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द आहे ते ओळखा.
1) मासिक 2) दैनिक 3) सामासिक 4) षण्मासिक
उत्तर :- 4
4) पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुध्द लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.
1) षष्ठयब्दिपूर्ती 2) षष्टयब्दिपूर्ति 3) षष्टयब्दीपूर्ती 4) षष्टयब्दिपुर्ति
उत्तर :- 1
5) घटना प्रसंगासाठी साजेशी म्हण शोधा.
‘एखादी गोष्ट खूप वेळा चर्चिली गेली की तिचे महत्त्व कमी होते.’
1) फार झाले हसू आले 2) नव्याचे नऊ दिवस
3) नवी विटी नवे राज्य 4) नाव मोठे लक्षण खोटे
उत्तर :- 1
________________________________
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️
● लाजरा x धीट
● हिंसा x अहिंसा
● राजमार्ग x आडमार्ग
● श्वास x नि:श्वास
● सुर x असुर
● साक्षर x निरक्षर
● सुरस x निरस
● पूर्णांक x अपूर्णांक
● नि:शस्त्र x सशस्त्र
● सुजाण x अजाण
● गंभीर x अवखळ
● सुलक्षणी x कुलक्षणी
● चोर x साव
● सुज्ञ x अज्ञ
● सुकाळ x दुष्काळ
● सगुण x निर्गुण
● चपळ x मंद
● सुबोध x दुर्बोध
● दुष्ट x सुष्ट
● स्वातंत्र्य x पारतंत्र्य
● साकार x निराकार
● स्वर्ग x नरक
● दिन x रजनी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
No comments:
Post a Comment