Sunday, 24 April 2022

महिला आर्थिक विकास महामंडळ

महिला आर्थिक विकास महामंडळ

आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त २४ फेब्रुवारी १९७५ रोजी महाराष्ट्र शासनाकडून महिला आर्थिक विकास महामंडळाची (माविम) स्थापना करण्यात आली. २० 

जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने माविम ला बचत गटांच्या (Self Help Groups) माध्यमातून विविध महिला सबलीकरणाच्या योजना राबविण्यासाठी नोडल संस्था म्हणून जाहीर केले आहे.

माविम चे मिशन

मानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून,

याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे

आणि 

महिलांना समान न्याय मिळवून देणे.” हे माविमचे मिशन आहे. माविमची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे व्यवस्थापन करणे.
महिलांच्या एकंदर क्षमतांचे संवर्धन करणे.

महिलांमधील आत्मविश्र्वास वृध्दीगंत करणे.
महिलांचा उद्योजकीय विकास करणे.

रोजगाराच्या संधी आणि  बाजारपेठांमध्ये समन्वय निर्माण करणे.

समान संधी, समृध्दता आणि शासनामध्ये महिलांनी स्वत:हून सहभाग घ्यावा याकरिता त्यांना प्रोत्साहन देणे.

शाश्वत विकासाचा मार्ग म्हणून एस एच जी सोबत तळागाळात काम करणाऱ्या संस्था निर्माण करणे.

No comments:

Post a Comment