Monday, 25 April 2022

बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती

बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Buldhana District Information In Marathi
Buldhana District History Information

बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभागात येणारा जिल्हा असुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या जिल्हयातुन गेला आहे.  बुलढाणा विदर्भात पश्चिमेकडे येणारा जिल्हा आहे, बुलढाण्याच्या उत्तरेला मध्यप्रदेश, पुर्वेकडे अकोला, वाशिम, आणि अमरावती जिल्हा, दक्षिणेकडे जालना आणि पश्चिमेकडे जळगाव व औरंगाबाद जिल्हा आहे.


Buldhana District Information

बुलढाणा जिल्हयातील तालुके – Buldhana District Taluka List
या जिल्हयात एकुण 13 तालुके आहेत

बुलढाणा
चिखली
देउळगांव राजा
खामगांव
शेगांव
मलकापुर
मोताळा
नांदुरा
मेहकर
लोणार
सिंदखेड राजा
जळगांव जामोद
संग्रामपुर
बुलढाणा जिल्हयापासुन काही प्रमुख शहरांचे अंतर –

बुलढाण्या पासुन औरंगाबाद 150 कि.मी, पुणे 425 कि.मी., अमरावती 200 कि.मी., नागपुर 350 कि.मी अंतरावर आहे.

बुलढाणा जिल्हयाला धार्मिक आणि ऐतिहासीक आणि वैज्ञानिक असा त्रिवेणी संगमाचा वारसा लाभलेला आहे.  प्रसिध्द असे श्री संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे शेगाव याच जिल्हयात आहे, लाखोंच्या संख्येत भाविक नेहमी या तिर्थस्थानी येत असतात.

शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाउ माॅंसाहेबांचे माहेर याच जिल्हयातील सिंदखेड राजा आहे जिथे दरवर्षी जिजाउं जन्मोत्सव अत्यंत दिमाखात साजरा होत असतो. आणि वैज्ञानिक दृष्टीने देखील या जिल्हयाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे ते लोणार तालुक्यातील सरोवरामुळे.

लोणार सरोवर हे खा.या पाण्याचे सरोवर असुन पृथ्वी वर उल्का पडल्यामुळे या सरोवराची निर्मीती झाली आहे. अश्या प्रकारचे हे एकमेव सरोवर असल्याचे देखील बोलल्या जाते. आणि म्हणुनच बुलढाणा जिल्हयाला धार्मीक, ऐतिहासीक आणि वैज्ञानिक महत्व असल्याचं बोलल्या जातं.

बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळं – Tourist Places In Buldhana

बुलढाणा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे त्यातलीच ही काही महत्वाची पर्यटन स्थळं.

शेगाव – Gajanan Maharaj, Shegaon
शेगाव हे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पावन पदस्पर्शाने अतिशय प्रसिध्द आणि धार्मीक स्थळ बनले आहे.  शेगाव संस्थान आपल्या स्वच्छतेमुळे, शिस्तीमुळे देखील ओळखल्या जाते.

संस्थान ने अनेक समाजउपयोगी कार्य देखील केले आहे, आनंद सागर हा प्रकल्प शेकडो एकरात तयार झालेला अत्यंत सुरेख आणि रमणिय परिसर शेगाव संस्थानच्या दुरदृष्टीकोनाची साक्ष देतो.

अत्यंत माफक दरात आनंदसागरची सहल करता येत असल्याने अनेक शाळा आपल्या विद्याथ्र्यांना या ठिकाणी सहलीकरता आणत असल्याचे दिसते.  सुट्टीच्या दिवसांमधे आनंद सागर हा प्रकल्प गर्दीने फुलुन गेलेला पहायला मिळतो.

अंबा बरवा अभयारण्य –
हे अभयारण्य देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे.  अनेक वन्यजिवांचे इथे वास्तव्य असुन त्यामधे वाघ, चित्ता, सांबर, हरिण, चैसिंगा (चार शिंगाचे हरिण) आणि विविध पक्ष्यांचे हे निवासस्थान आहे.  अभयारण्याला भेट देण्याचा चांगला काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी आहे, पण जनावरांना पाहाण्याकरता एप्रील ते 15 जुन हा देखील चांगला काळ आहे. या व्यतीरीक्त बुलढाण्यापासुन 8 कि.मी. अंतरावर दिनगंगा अभयारण्य देखील पाहाण्यासारखे आहे.  इथे देखील अनेक वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार आपल्या दृष्टीस पडु शकतो.

लोणार सरोवर – Lonar Crater Lake
पृृथ्वीवर उल्का पडल्यामुळे तयार झालेले लोणार सरोवर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे.  जगातल्या पाच मोठया सरोवरापैकी लोणार सरोवर हे एक आहे.  खा.या पाण्याचे हे  सरोवर जवळपास 52,000 वर्ष जुने असल्याचे देखील बोलल्या जाते.  हे सरोवर संपुर्ण जंगलाने वेढले असल्याने वेगवेगळया पक्ष्यांचे निवासस्थान आहे.  सरोवरानजीक गोमुख असुन यातुन 12 ही महिने अखंड धार पडत राहाते.

नांदु.याचा हनुमान
बुलढाणा जिल्हयातील नांदुरा इथं एक विशालकाय आकाराची हनुमंताची मुर्ती भाविकांना आकर्षित करणारी आहे.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ही मुर्ती स्थापली असुन या मुर्तीची उंची 105 फुट आहे.  संपुर्ण जगात एवढी विशाल हनुमानाची ही एकमेव मुर्ती आहे.  या मुर्तीला 30 फुटांचा आधार देण्यात आला आहे, शेपटी 70 फुट लांब असुन हात 25 फुटांचे आहेत.  या महामार्गावरून ये जा करणारे या मुर्तीला पाहुन आश्चर्यचकीत होतात.  लांबलांबुन पर्यटक या मुर्तीला पाहाण्यासाठी गर्दी करतात.

या व्यतीरिक्त देखील बरीचशी स्थानं बुलढाणा जिल्हयात असुन ती पे्रक्षणीय आणि भाविकांच्या गर्दीने कायम फुलली असतात.  देवगांव चे बालाजी मंदीर, मेहकर चे बालाजी मंदीर, मेहकर चा कंचनीचा महाल, लोणारचे दत्त सुदान मंदीर, चिखलीचे रेणुका देवी मंदीर, सैलानी बाबा दर्गा, सिंदखेड येथील राजमाता जिजाउंचे जन्मस्थान, प्रल्हाद महाराजांचे साखरखेर्डा, कमळजा देवी मंदीर, खामगाव मधे जनुना तलाव, अमृत नगर, बोथा जंगल, वाघलीचे हनुमान मंदीर इत्यादी ठिकाणं पाहाण्यासारखी आहेत.

जिल्हयाविषयी काही विशेष माहिती – Buldhana District Information
2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 2,586,258
बुलढाणा जिल्हयाचे क्षेत्रफळ 9,640 कि.मी.
साक्षरतेचे प्रमाण 82.09%
प्रमुख राजमार्ग नॅशनल हायवे नं. 6
मुख्य पिकांमधे कापुस, ज्वारी असुन त्याव्यतिरीक्त तिळ, सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग देखील या भागात घेतले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...