✅ज्वारी (कोरडवाहू पीक)✅
● ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. रब्बी व खरीप दोन्ही हंगामामध्ये घेतल्या जाते.
● महाराष्ट्रात एकूण लागवडी पैकी 35% क्षेत्रात ज्वारी लावले जाते हे देशाच्या एकूण ज्वारी उत्पन्नाच्या ते 46% आहे.
● हे पीक 25 ते 26 डिग्री सेल्सिअस तापमान व 50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीत घेतले जाते म्हणून याला कोरडवाहू पीक म्हणतात.
● महाराष्ट्रात पठारात हे पीक घेतले जाते.
● कोकणात व पूर्व विदर्भात हे पीक घेतले जात नाही कारण तिथे पावसाचे प्रमाण जास्त असते.
●कायम भुसभुशीत मृदेत ज्वारीचे उत्पादन चांगले होते हे पीक खरीप व रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते.
●खरिपातील झालेला "जोंधळा "असे म्हणतात तर रब्बी च्या ज्वारी ला शाळू असे म्हणतात.
■ज्वारीच्या प्रमुख जाती:
फुले, माऊली, फुले चित्रा, फुले सुचित्रा, फुले अनुराधा
◆महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम:
सोलापूर >अहमदनगर> पुणे
◆सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे:
सोलापूर> अहमदनगर> सांगली
◆सर्वाधिक हेक्टरी उत्पादन:
चंद्रपूर> जळगाव> कोल्हापूर
◆रोगांचा प्रादुर्भाव:
तुडतुडे, खोडकिडा, खोडमाशी, मावा, लाल कोळी, खळखळया.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment