मूलभूत कर्तव्ये
घटनेतील कलम 51 (अ) आणि 55 मध्ये 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे.
स्वर्णसिंह कमिटीच्या शिफारशिनुसार खालील 10 मूलभूत कर्तव्यांचा भारतीय घटनेत समावेश करण्यात आलेला आहे.
1. घटनेतील आदर्शचा , राष्ट्रीय ध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर करणे.
2. स्वतंत्र लढ्यापासून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे अनुपालन करणे.
3. भारतीय सार्वभौमत्व व एकात्मता यांचे संरक्षण करणे.
4. राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्राला गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवेस धौन जाणे.
5. सार्व भारतीयांमध्ये एकात्मता बंधुभाव निर्माण करणे.
6. जंगल, सरोवरे , नद्या , तळे , वन्य प्राणी यासारख्या नैसर्गिक देणग्यांचे संरक्षण करणे.
7. आपल्या संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे.
8. शास्त्रीय दृष्टीकोन, मानवता व अभ्यासूवृती यांची वाढ करणे.
9. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे.
10. व्यक्तीगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेने वाटचाल करणे.
__________________________________
मूलभूत अधिकार/हक्क
भारतीय राज्यघटनेच्या तिसर्या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे.
घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे.
म्हणून सध्या 6 अधिकार आहेत.
1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18
2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22
3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24
4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28
5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30
6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार – कलम 32
No comments:
Post a Comment