Tuesday 5 April 2022

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा ‘यश’ नावाचा जनजागृती कार्यक्रम

- विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी कम्युनिकेशन (NCSTC) या संस्थेनी कोविड-19 वर लक्ष केंद्रित करुन आरोग्य आणि धोक्यासंदर्भात ‘इयर ऑफ अवेयरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ (यश)’ नावाचा नवा कार्यक्रम आरंभ केला.

- ‘इयर ऑफ अवेयरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ (यश / YASH)’ हा एक जनजागृती कार्यक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून लोकांना कोविड-19 विषाणू आणि त्याचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याबाबत अचूक आणि शास्त्रोक्त माहिती प्रदान केली जाणार.

- देशातल्या वैविध्यपूर्ण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमात आरोग्य, विज्ञान, जोखीम सांगणारे सॉफ्टवेअर, ध्वनी-दृष्य, डिजिटल व्यासपीठ, लोककला इत्यादी माध्यमांचा समावेश करण्यात येणार आहे.

- तसेच कार्यक्रमातल्या अडचणी सोडविण्यासाठी संशोधन, शैक्षणिक, प्रसार माध्यमे आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असणार. जोखीम स्पष्ट करण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी वैज्ञानिक आणि योग्य आरोग्यविषयक माहितीचा वापर केला जाणार.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...