Thursday, 21 April 2022

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


1) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
उत्तर- औरंगाबाद

2) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
उत्तर- सातपुडा

3) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- जम्मू काश्मीर

4) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

5) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
उत्तर- सुरत

6) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
उत्तर- 1942

7) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
उत्तर- 36

8) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर- चित्रपट

9)) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

10) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
उत्तर- लुंबिनी

11) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
उत्तर- आरबीआय

12) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
उत्तर- स्टीपल चेस

13) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर- महापौर

14) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

15) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
उत्तर- औरंगाबाद

16) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर- 78

17) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर- पुणे

18) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तर- प्रवरानगर 

19) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

20) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
उत्तर- औरंगाबाद 

21) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- उत्तराखंड 

22) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
उत्तर- गोविंदाग्रज 

23) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
उत्तर- उपराष्ट्रपती 

24) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- भारतीय संसद

25) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
(मार्गदर्शक दशरथे सर): उत्तर- महादेव गोविंद रानडे

26) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो?
उत्तर- ग्रामसेवक

27) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
उत्तर- 18

28) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
उत्तर- पोलीस महासंचालक 

29) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
उत्तर- संत रामदास.

30) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- पुणे

31) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- साहित्य

32) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी

33) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35

34) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक 

35) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी

36) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी

37) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स.

38) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

39) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू

40) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट

No comments:

Post a Comment