Sunday, 24 April 2022

भारताचे स्थान व विस्तार माहिती : भारताचे क्षेत्रफळ, सागरी सीमा,शेजारील देश

भारताचे स्थान व विस्तार माहिती : भारताचे क्षेत्रफळ, सागरी सीमा,शेजारील देश

भारताचे स्थान व विस्तार माहिती : आज आपण भारताचे स्थान व विस्तार या विषयी माहिती बगणार आहोत.तशेच त्यामध्ये आपण भारताचे क्षेत्रफळ किती आहे? किंवा भारताला एकूण किती किमी लांबीची सागरी सीमा लागलेली आहे? तसेच भारताच्या शेजारील देशांची नावे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण भारताचे स्थान व विस्तार यामध्ये सविस्तर बगणार आहोत.

भारताचे स्थान व विस्तार माहिती
भारताचे स्थान (Bhartache Sthan):
• भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात  येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.


भारताचा विस्तार(bhartacha Vistar) :
अक्षवृत्तीय विस्तार : ८४ ते ३७°६’ उत्तर अक्षांश (८°४२८ ते ३७०६५३” उत्तर अक्षांश)
रेखावृत्तीय विस्तार : ६८०७ ते ९७०२५ पूर्व रेखांश (६८०७’३३” ते ९७०२४४७” पूर्व रेखांश)
रशिया, कॅनडा, चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यासाररख्या देशानंतर भारत हे जगातील सातवे मोठे राष्ट्र आहे.
भारताच्या शेजारील देशांची नावे : भारताच्या वायव्येस : पाकिस्तान व अफगाणिस्तान, उत्तरेस : चीन, नेपाळ, भूटान दक्षिणेस: श्रीलंका ,आग्नेयेस : इंडोनेशिया नैऋत्येस : मालदीव
• पूर्वेस म्यानमार (ब्रह्मदेश) व बांगला देश ही राष्ट्रे आहेत.

• पूर्वस : बगालचा उपसागर, पश्चिमेस : अरबी समुद्र. दक्षिणेस : हिंदी महासागर

• निकोबार बेटावरील ‘इंदिरा पॉइंट (६०४५’ उत्तर अक्षांश)‘ हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

• भारताला दक्षिणेकडील तिन्ही बाजूंनी महासागराची सीमा लागलेली आहे. भारताच्या पश्‍चिम आणि नैऋत्य दिशेला अरबी सागर,  दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्व व आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागराचा सीमा लागलेली आहे.


• दक्षिणेस बगालच्या उपसागरात पाल्कच्या सामुद्रधुनीने व मन्नारच्या आखाताने भारत व श्रीलंका या देशाना अलग केले आहे. (या दोन देशांदरम्यानचा अॅडमचा पूल हा सध्या वादाचा मुद्दा बनलेला आहे.)

• भारताचे क्षेत्रफळ : ३२.८७,२६३ चौ.किमी (३२८.७ दशलक्ष हेक्टर्स किंवा १२,६९,२१९ चौ.मैल)

• भारताला एकूण 7517 किमी लांबीची सागरी सीमा लागलेली आहे.

• जागतिक क्षेत्रफळाच्या २.४२% क्षेत्र भारताने व्यापले आहे.

• भारताची दक्षिणोत्तर लांबी : ३२१४ कि.मी. (काश्मीरचे उत्तर टोक (दफ्दार) ते मुख्य भूमीचे दक्षिण टोक (कन्याकुमारी)

• पूर्व-पश्चिम विस्तार : २९३३ कि.मी. (गुजरातचे पश्चिम टोक (घुअरमोटा) ते अरुणाचल प्रदेशचे पूर्व टोक (किवियू)


• भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे.

• भारताच्या सागरी सीमा  ६ देशांशी संलग्न आहे.


No comments:

Post a Comment