Sunday, 24 April 2022

महिला व बाल विकास आयुक्तालय

महिला व बाल विकास आयुक्तालय

महिला व बाल विकास आयुक्तालय महिला आणि बालकांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सबलीकरणासाठी विविध धोरणे आणि उपक्रमांच्या मार्फत कार्यरत आहे.


या अतंर्गत जाणीव जागृती करणे, लिंग आधारीत समस्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, गरजू महिला आणि बालकांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा विकास व्हावा ह्यासाठी संस्थात्मक आणि कायदेशीर साहाय्य करणे यांचा समावेश होतो. महिला व बाल विकास आयुक्तालयाची काही प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत:

महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणासाठी तसेच बालकांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी कायदे, धोरणे, कार्यक्रम आणि योजनांची अंमलबजावणी करणे.

एकात्मिक बाल संरक्षण योजनेची अंमलबजावणी करणे

महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी बाल गृहे, महिलांसाठी निवारा गृहे, निरीक्षण गृहे, विशेष दत्तक संस्था ई. ची स्थापना करणे आणि त्यांवर नियंत्रण ठेवणे.


पालक विभाग, इतर सरकारी विभाग, भारत सरकार यांच्याशी महिला आणि बालक संबंधित कार्यक्रम राबवितांना एकभिमुखता राखण्यासाठी समन्वय साधणे.

कोणत्याही प्रकारची मालमत्ता नसलेल्या आणि दुर्लक्षित महिलांना रोजगार मिळवा म्हणून त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे आणि महिलांना बचत गटा मार्फत कर्ज उपलब्ध करून देणे

No comments:

Post a Comment