Friday, 29 April 2022

मराठी भाषा,भारतीय भाषा

मराठी भाषा
भारतीय भाषा

मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीच वय सुमारे २२०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.[१]

मराठी भाषा
मराठी
Devanāgarī and Modi scripts.svg
"मराठी" - देवनागरी आणि मोडी लिपीमध्ये
प्रदेश
महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात- गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू
लोकसंख्या
९ कोटी
क्रम
१०
बोलीभाषा
कोळी, आगरी, माणदेशी, वऱ्हाडी, तंजावर मराठी, कुणबी, महाराष्ट्रीय कोंकणी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  इंडो-आर्य
   इंडो-आर्य दक्षिण विभाग
    महाराष्ट्री प्राकृत
     मराठी-कोंकणी
       मराठी

मराठी भाषा
लिपी
देवनागरी (प्रचलित), मोडी लिपी (एके काळची)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भारत
राज्यभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली
भाषा संकेत
ISO ६३९-१
mar
ISO ६३९-२
mr
भाषिक प्रदेशांचा नकाशा
मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश लाल रंगात दर्शविलेला आहे
मराठी भाषिक प्रदेश
संपादन करा
मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील 09 राज्ये,4 केंदेशशित प्रदेश आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.

मराठी भाषा भारतासह, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[२] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.[३]

राजभाषा
संपादन करा
भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादरा व नगर हवेली[४] या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)[५], महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)[६], उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ[७], देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)[८] व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)[९] येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.

प्रमाणभाषा
संपादन करा
प्रमाणभाषा ही एक बोली भाषाच असते. तथापि त्याचे नियम पक्के बांधलेले आणि मान्यताप्राप्त असतात. यामुळे सर्वत्र एकाच प्रकारचे लेखन केले जाते आणि त्यामुळे भाषा वाढीस त्याचा उपयोग होतो. यास मानक भाषा अथवा प्रमाण भाषा असेही म्हंटले जाते. भाषेचे मानकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. भाषा प्रामाणिकरण प्रक्रिया स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जावे लागतात. मानक भाषा हा समाजात वापरल्या जाणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित संप्रेषणांमध्ये व्यापकपणे ओळखल्या जाणाऱ्या परंपरांचा संग्रह असतो. मराठी साहित्य महामंडळाने पाठवलेल्या लेखनविषयक नियमांची यादी इ.स. १९७२ मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्य केली. त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि ते त्वरित अंमलात आणावेत, असा शासकीय आदेश काढला आहे. मराठी भाषेमध्ये त्या नियमांनुसार मानक भाषा मराठीचे लेखन केले जाते.[१०] औपचारिक लेखन करतांना मराठी प्रमाणभाषा वापरली जाते. औपचारिक व ग्रांथिक लेखनासाठी सर्वमान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असणे आवश्यक असते. औपचारिक लेखन म्हणजे वैचारिक, वैज्ञानिक, शास्त्रीय लेखन, ललितेतर साहित्य, रस्त्यावरच्या सूचना फलक, वर्तमानपत्र बातम्या, संपादकीय, मासिकातील लेख, शासकीय पत्रव्यवहार इत्यादी लेखनात प्रमाणभाषेचाच वापर करणे आवश्यक आहे.[११] याशिवाय व्याख्याने आणि परिसंवादांमध्ये प्रमाणभाषेचाच वापर केला गेला जातो. प्रमाण भाषा म्हणजे एकसारखी भाषा वापरल्याने भाषेला स्थिरता येते.

प्रमाणभाषा महत्त्व आणि उपयोग
संपादन करा
एका प्रकारे लिहिलेल्या भाषेला संगणकीकृत शोध घेतांना प्रमाणभाषा वापरलेली असेल तर त्याचा उपयोग होतो आणि योग्य ते लेखन सर्च इंजिनास सापडते. अन्यथा प्रत्येक वेळी निराळा शोध देत बसावे लागेल आणि इतके करूनही सर्व माहिती मिळाली असे म्हणता येणार नाही. तसेच कायदे विषयक लेखन करतांना एकाच प्रकारच्या भाषेमध्ये करणे आवश्यक आहे. अन्यथा कायद्याचा अर्थ लावणे अशक्य होईल. याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही निदान करणे अवघड होईल. कारण एकाच रोगासाठी डॉक्टर अनेक शद्ब वापरू लागले तर रुग्णास नक्की काय होते आहे याचे निदान करून त्याची औषधे मिळवणे शक्य होणार नाही. यामुळे मानक भाषेचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. एकच भाषा वापरल्याने सामायिक मराठी संस्कृती स्थापित होते आणि आम्ही मराठी आहोत असे म्हणत येते. असा भाषेचा उपयोग चीन मध्ये झालेला दिसून येतो. चीन मध्ये अनेक बोली भाषा होत्या पण एकच प्रमाणित चीनी भाषा ही मानक भाषा म्हणून लागू केल्याने सर्व चीनी लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. तसेच इस्राएल देशा मध्ये हिब्रू भाषा संवर्धनात मानक भाषा वापरल्याने हिब्रू भाषा समर्थ झाली आणि आज एकेकाळी मृत झालेलेल्या भाषेत आज शास्त्रीय संशोधने प्रकाशित होत आहेत. याच प्रमाणे मराठी भाषेत लेखन करतांना अथवा संशोधन निबंध प्रकाशित करण्यासाठी व्याकरणाचे शासकीय नियम असलेली मराठी भाषा वापरणे आवश्यक आहे.

मराठी भाषा दिवस
संपादन करा
मुख्य लेख: मराठी भाषा दिन
१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याखेरीज विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी पुस्तके
संपादन करा
'लीळाचरित्र' हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशीत झाले असून , त्यातील कैक प्रकाशने जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. सरकारी संस्था ’बालभारती’ दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारताच्या सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ हे[ संदर्भ हवा ], आणि देशातले सर्वाधिक खपाचे च़ौथ्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे[ संदर्भ हवा ]. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत[ संदर्भ हवा ].

शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अर्वाचीन चरित्र कोश, प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव), तत्त्वज्ञानकोश, तुलनात्मक भाषा विज्ञान (भोलानाथ तिवारी+उदय नारायण तिवारी+पांडुरंग दामोदर गुणे) वाङ्मय कोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, स्थलकोश, ज्ञानकोश (श्री.व्यं केतकर), असे अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो[ संदर्भ हवा ].

पुरस्कार
संपादन करा
विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
'मूर्तिदेवी पुरस्कार' शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी मिळाला आहे.
महेश एलकुंच़वार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना 'सरस्वती सन्मान' मिळाले आहेत.
विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना 'कालिदास सन्मान' मिळाले आहेत.
महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांचा नावाने 'अखिल भारतीय कला सन्मान' दिला जातो.
भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आजवर बालगंधर्वना मिळाले आहेत.
सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ आचार्य अत्रे यांच्या ''श्यामची आई'’ चित्रपटास मिळाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, पां.वा. काणे, भीमसेन जोशी, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, विनोबा भावे आणि लता मंगेशकर हे आजवरचे भारतरत्‍न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीय.
भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
मराठी भाषेचा इतिहास
संपादन करा
मुख्य पान: मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण [१२] आदि ग्रंथांची भर घातली.

इ.स.११३० मध्ये कोरलेला मराठी शिलालेख
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६०[१३] मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.

राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे [ संदर्भ हवा ]. अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा आद्य मराठी लेख समजला जात असे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख इ.स. १८८३च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे -

गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री-
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-
वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-
लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ
कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
मीची वआण । लुनया कचली ज

राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख इ.स. १०१२
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ(?) व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे कोरीवकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.

अर्थ : "जगी सुख नांदो. ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले." लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे.

कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।' कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.

मराठी भाषेत कालानुक्रमे झालेले बदल
संपादन करा
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे २५०० वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.

आद्यकाळ
संपादन करा
हा काळ इ.स. १२०० पूर्व, म्हणजे लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लिखाणाचाही पूर्वीचा काल होय. काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात तसेच़ शिलालेखात आढळतात.

परळ, मुंबई येथे आढळलेला शिलालेख. हा इ.स ११०९ मध्ये कोरला गेला.
यादवकाळ
संपादन करा
हा काळ इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरीचा यादवांच़े महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार,नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याच़े दालन वैविध्यानी समृद्ध केले.

बहामनी आणि सल्तनत काळ
संपादन करा
हा लेख बघा:मराठी भाषेत प्रक्षिप्त फारसी शब्द

मराठी लेखक व कवी संत सर्वज्ञ दासोपंत यांच़े सुमारे १६ व्या शतकातील लिहिलेले मराठी.
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी काळ सुरू झ़ाला. सल्तनत काळात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. राज्यकर्ते मुस्लिम असले तरी स्थानिक सरंजामदार, जमीनदार,महसूल गोळा करणारे अधिकारी आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदू होती. प्रशासन आणि महसूल संकलन सुलभ करण्यासाठी, सुलतानांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये मराठीच्या वापरास प्रोत्साहन दिले. तथापि, त्या काळातील मराठी भाषेत बरेच फारसी प्रचलित झाले. उदाहरणार्थ, दररोजच्या भाषणात वापरलेले शब्द जसे की बाग, कारखाना, शहर, बाजार, दुकान, हुशार, कागद,खुर्ची, जमिन,जाहिरात), हजार इत्यादी. [१४][१५][१६] अहमदनगर सल्तनत काळात मराठी ही प्रशासनाची भाषा बनली.[१७][20] विजापूरच्या आदिलशाहीनेही प्रशासन आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी मराठीचा वापर केला.[१८] अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णूदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.

मराठा साम्राज्याचा काळ
संपादन करा
हा काळ अंदाजे इ.स. १६५० ते इ.स. १८१८ असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झ़ाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांच़े आक्रमण थंडावले. असे मानले ज़ाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच़ काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.

रामदास स्वामी यांच़े इ.स १६०० शतकातले मराठी हस्ताक्षर.
याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केलया. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.

इंग्रजी कालखंड
संपादन करा
हा काळ इ.स. १८१८ ते आज़तागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच़ काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याच़ा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.

छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कॅंडी या आंग्ल अधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1926 पासून राबवली त्यातूनच अनेक मराठी शब्द निर्माण झाले आणि ते आज प्रचलित आहेत . ते वापरण्यात येऊ लागले

स्वातंत्र्योत्तर कालखंड
संपादन करा
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी चळवळ राबवली त्यातूनच महानगरपालिका क्रीडांगण सारखे महत्त्वाचे मराठी शब्द निर्माण झाले साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पॅंथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अ‍ॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.[ संदर्भ हवा ]

‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पॅंथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.

‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री.ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग.वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.

अभिजात मराठी
संपादन करा
मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-

इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
गाथा सप्तशती हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाअगोदर किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...