Wednesday, 27 April 2022

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४


२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड

३) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट

४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी …….  हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन


५) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण

६) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
उत्तर: होन

७) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी ………निर्माण केले.
उत्तर: अष्टप्रधान मंडळ

८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
उत्तर: गागाभट्ट


९) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला.
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०

१०) “जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय” असे………नी म्हटले आहे.
उत्तर: न्या.म.गो.रानडे

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती (Names of Shivaji Maharaj bodyguards)
११) छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड

१२) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.
उत्तर: ६४०


१३) युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड

१४) शिव कालगणनेची………रोजी सुरुवात झाली.
उत्तर: ६ जून, १६७४

१५) छत्रपती शिवाजी महाराजांना……..यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
उत्तर: डॉ.बाळकृष्ण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा


१७) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४

१८) शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
उत्तर: तांबा

१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार……..या बंदरावर आणले होते.
उत्तर: ब्याक बे

२०) कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८

२१) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
उत्तर: ३६१

२२) ………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६

२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९

२४) शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३


२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश

२६) शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
उत्तर : मध्ययुगाचा काळ

२७) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : जुन्नर

२८) तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : व्यंकोजी महाराज

२९) छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर : वढु बु

३०) अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
उत्तर : प्रतापगड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती (chhatrapati shivaji maharaj information in marathi)
३१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

३२) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)

३३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
उत्तर : अष्टप्रधान मंडळ

३४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड

३५) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर : बुधभूषण

३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)

३७) छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?
उत्तर : होण

३८) छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
उत्तर : शिवराई


३९) स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे

४०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

४१) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : भोर

४२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
उत्तर : हंबीरराव मोहिते

४३) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
उत्तर : तोरणा

४४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
उत्तर : आदिलशहा

४५) छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
उत्तर : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न उत्तर मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj question answers in marathi)
४६) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?
उत्तर : गागाभट्ट

४६) कोंढाणा गड कोणी सर केला होता?
उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे

४७) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?
उत्तर : रायरेश्वराचे मंदिर

४८) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
उत्तर : सिंहगड

४९) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
उत्तर : बहिर्जी नाईक

५०) मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?
उत्तर : वेरूळ

५१) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड

५२) स्वराज्यात सचिवपदी कोण होते?
उत्तर : अण्णाजी दत्तो

५३) स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस

५४) स्वराज्यात सुमंत कोण होते?
उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर

५५) स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
उत्तर : निराजी रावजी

५६) स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
उत्तर : मोरेश्वर पंडितराव

५७) स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
उत्तर : कारखानीस

५८) स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
उत्तर : 370

५८) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता?
उत्तर : 11 मार्च 1689

५९) अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
उत्तर : पंताजी गोपीनाथ

६०) जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
उत्तर : पुरंदरचा तह

६१) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
उत्तर : कांहोजी आंग्रे

६२) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
उत्तर : शाहिस्तेखान

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...