Tuesday, 5 April 2022

सामान्य ज्ञान

जीवशास्त्र : मानवी पचनसंस्था । एमपीएससी-२०२० । विज्ञान । MPSC EXAMS HUB
मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
अन्ननलिकेची लांबी 9 meter  असते.
मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.

अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
ग्रसनी (Pharynx)
ग्रसिका (Esophagus)
जठर/ आमाशय (Stomach)
लहान आतडे (Small Intestine)
मोठे आतडे (Large Intestine)
मलाशय (Rectum)
गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

जीवशास्त्रामध्ये मानवी पचनसंस्था फार महत्वाची संस्था आहे( एमपीएससी-२०२० । विज्ञान ) ज्यामध्ये पुढीलप्रमाणे घटक येतात.

लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.

पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.

अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.




पचनसंस्था :-

प्राण्याच्या शरीरातली पचनसंस्था ही त्याच्या शरीरातील अनेक अवयवांची बनलेली आहे. या संस्थेमुळे खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. ही पोषकद्रव्ये शरीराची वाढ व चलनवलन यांसाठी उपयोगी पडतात.

माणसाच्या पचनसंस्थेत पुढील अवयव असतात:

तोंड, घसा, अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय, लहान आतडे, मोठे आतडे, गुदाशय व गुदद्वार.

१) तोंड:-

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो.

आजार:-

तोंडाच्या आतील श्लेष्मल त्वचेला येणारी सूज म्हणजेच स्टोमॅटिटिस अर्थात ‘तोंड येणं.’ कारणांनुसार याची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात.

अतितीव्र आम्ल, अल्कली किवा औषधांचा संपर्क तोडांतील त्वचेशी आल्यास. व्हिटॅमिन ‘बी’ची कमतरतेमुळे.

२)घसा:-

घसा हा मानवी शरीराचा एक भाग आहे.

३) अन्ननलिका:-

अन्ननलिका ही एक स्नायुयुक्त नलिका असते जी घसा ते जठराचे वरचे मुख यांना जोडते. नलिकेतून अन्न स्नायुंच्या हलचालींच्या साहाय्याने पुढे ढकलले जाते.

तिची लांबी २०-२५ से.मी. पर्यंत असते. अन्ननलिकेची आतील बाजूस स्तरीकृत स्क्वैमस उपकला (Stetified Squamous Epithelium) असते.

४) जठर:-

जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते.

जठर विकार:-

जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात.

या आम्लपात्ति छातीत पोटात जळजळ, पोटदुखी, अपचन, डोकेदुखी, उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते.




No comments:

Post a Comment