Thursday, 28 April 2022

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार
⏩काळी मृदा

✔️बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात. ✔️मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.

✔️या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशियम या घटक द्रव्यांचे प्रमाण असते. तर नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.


✔️ही अत्यंत सुपीक मृदा आहे.यामध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते.

✔️महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांमध्ये आढळते.

✔️महाराष्ट्रात काळ्या मृदांमध्ये कापूस, ऊस, फळे, गहू, ज्वाररी, कडधान्ये ही पिके घेतली जातात.

⏩जांभी मृदा

✔️2000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्य व निश्‍चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते.

✔️सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून नेले जातात. परिणामत: लोह व अल्युमिनियम मृदातील प्रमाण वाढते.

✔️या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पददार्थ या द्रव्यांचे प्रमाण कमी असते. या मृदेची सुपीकता कमी आहे.


✔️महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्हयात ही मृदा आढळते. या मृदेमध्ये तांदूळ हे प्रमुख पिके घेतली जाते.


✔️डोंगर उतारावर फलोत्पादन केले जाते.

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार
⏩गाळाची मृदा

✔️सततच्या संचयनामुळे नदी खोर्‍यांच्या सखल भागात विशेषत: पूर मैदानात ही मृदा आढळते. ✔️बारीक पोत व पाण्याची सहज उपलब्धता यामुळे सतत नवीन गाळ येत राहण्यामुळे ही मृदा सुपीक बनते.

✔️महाराष्ट्रातील मुख्य नद्यांच्या सखल भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते.


✔️उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोर्‍यात खूप खोलवर गाळाचे संचयन झाले आहे. या भागात विस्तीर्ण गाळाच्या मृदांचे क्षेत्र आहे.


✔️गाळाची मृदा सुपीक असल्याने या मृदेत विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते.

⏩तांबडी-पिवळसर मृदा

✔️महाराष्ट्रात अतिप्राचीन काळातील गॅ्रनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांवर अपक्षय क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे.

✔️ही चिकणमाती व वाळूमिश्रित मृदा असून, तिच्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त होतो.

✔️तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाी असू शकतो.

✔️मृदेमध्ये चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक अ‍ॅसिड, सेंद्रिय द्रव्य व पोटॅशचे प्रमाण अत्यल्प असते. ✔️ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात आहे.

✔️या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात ही पिके घेता येतात .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...