Sunday, 3 April 2022

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती आणि भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखर आणि महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे:-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.

.⛰ भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ⛰

▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)

🟤महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे🟤
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

◆प्रवरा नदी व मुळा नदी  -  नेवासे, अहमदनगर

◆मुळा व मुठा नदी - पुणे

◆गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा, गडचिरोली

◆तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव तिर्थक्षेत्र, जळगाव

◆कृष्णा व वेष्णानदी -  माहुली, सातारा

◆तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

◆कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी, सांगली

◆कृष्णा व कोयना -  कराड, सातारा

◆गोदावरी व प्रवरा  - टोके, अहमदनगर

◆कृष्णा व येरळ -  ब्रम्हनाळ, सांगली



कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

◆ पालघर जिल्हा -
         दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

◆ ठाणे जिल्हा -
         भातसई , काळू , उल्हास

◆ रायगड जिल्हा -
         पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

◆ रत्नागिरी जिल्हा -
           सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

◆ सिंधुदुर्ग जिल्हा -
          काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...