Friday 1 April 2022

भारतीय हवाई दलाबद्दलच्या काही खास गोष्टी


⚡️‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे.
या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचविले.

🔸भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे.

🔸सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.

🔸१२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअरफोर्स असे झाले. १९५० साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या नावातील रॉयल हा शब्द वगळण्यात आला.

🔸भारतीय हवाई दलातील अधिकारी निर्मल जीत सिंग सिख्खोन हे परविरचक्र हा सुरक्षादलातील कामगिरीसाठी देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळवणारे हवाई दलातील पहिले अधिकारी ठरले. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🔸पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धामधील कामगिरीसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment