◾️दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ सुरुच आहे.
◾️ शतकी खेळीचं द्विशतकी खेळीत रुपांतर केल्यानंतर विराटने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत २५० धावांचा टप्पा ओलांडला.
◾️ विराट कोहलीने २५४ धावांवर नाबाद असताना दुसऱ्या बाजूने रविंद्र जाडेजा बाद ९१ धावांवर बाद झाल्यामुळे भारताने ६०१ धावांवर आपला डाव घोषित केला.
◾️या खेळीदरम्यान विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावांचा टप्पा ओलांडला.
◾️ विराटने माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांना मागे टाकलं आहे.
🏆आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावांचा टप्पा ओलांडणारे फलंदाज 🏆
📌विराट कोहली – ३९२ सामने
📌ब्रायन लारा – ३९६ सामने
📌सचिन तेंडुलकर – ४१८ सामने
◾️दरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटमधला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही मोडला.
◾️सचिनने कसोटीत २४८ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. विराटने आज सचिनला मागे टाकतं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे.
No comments:
Post a Comment