Sunday, 17 April 2022

भारतीय संघराज्याचे स्वरूप

भारतीय संघराज्याचे स्वरूप

आपल्या राज्यघटनेची मुलभूत वैशिष्ट्ये समजून घ्यायला हवी. यापैकी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य व्यवस्था. मुख्य परीक्षेतील पहिला घटक याच्याशी संबंधित आहेत.

भारतीय संघराज्याचे स्वरूप

कोकणात राजकीय वातावरण तापलं, दोन वजनदार नेते ईडीच्या रडारवर?
पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेतील राज्यव्यवस्था घटकाची चर्चा गेल्या दोन लेखांत आपण केली. पूर्व परीक्षेचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा लागतो तर मुख्य परीक्षेत तुलनात्मक व विश्लेषणात्मक दृष्टिकोन उपयुक्त ठरतो. अभ्यासाला सुरुवात करताना मुख्य परीक्षेच्या दृष्टीने करावी. राज्यघटनेतील प्रमुख तरतुदी समाविष्ट करण्यामागील घटनाकारांची नेमकी भूमिका काय होती हे लक्षात घ्यावे. त्याबरोबर गेल्या ६५ वर्षांमध्ये या तरतुदींचे स्वरूप कसे बदलले, हे बदल घडवण्यात संसद व सर्वोच्च न्यायालयाची काय भूमिका राहिली, यातून कोणते संघर्ष निर्माण झाले अशा विविध बाबींचा अभ्यास करायला हवा. यासाठी आपल्या राज्यघटनेची मुलभूत वैशिष्ट्ये समजून घ्यायला हवी. यापैकी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य व्यवस्था. मुख्य परीक्षेतील पहिला घटक याच्याशी संबंधित आहेत. २०१३ आणि २०१४ मध्ये त्या अनुषंगाने प्रश्नही विचारले गेले आहेत.

२०१३ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न
 लहान राज्यांच्या निर्मितीमुळे प्रभावी शासन निर्माण होईल का?
 आंतरराज्य जल विवाद सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या संविधानिक यंत्रणांच्या अपयशाची कारणमीमांसा करा.
 १३व्या वित्त आयोगाच्या स्थानिक स्वराज्य संस्था बळकटी देण्याविषयक तरतुदींची चर्चा करा.
२०१४ च्या मुख्य परीक्षेतील प्रश्न
 संघराज्य हे भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य असले तरी प्रबळ केंद्राच्या बाजूने भारतीय संघराज्य झुकलेले दिसते, हे प्रबळ संघराज्य व्यवस्थेच्या विरोधात आहे – चर्चा करा.
भारतीय संघराज्य (Indian Federalism)
संघराज्य म्हणजे केंद्र व राज्य अशा दोन स्तरावर स्वायत्त शासन यंत्रणा अस्तित्वात असणे. अमेरिकेने आधुनिक अर्थाने संघराज्य व्यवस्थेला सुरुवात केली. अमेरिकन संघराज्य प्रतिमानानुसार संघराज्य व्यवस्थेची ५ ठळक वैशिष्ट्ये असतात.
 द्विस्तरीय शासन (केंद्र व राज्य)
 दोन्ही स्तरांसाठी विशिष्ट अधिकार. ही अधिकार विभागणी स्पष्ट व घटनेद्वारे केलेली असावी.
 लिखित व परीदृढ म्हणजे बदलण्यास कठीण असणारी राज्यघटना.
 स्वतंत्र न्यायमंडळ याचे उद्दिष्ट केंद्र व राज्य किंवा राज्य व राज्य यांतील विवाद निष्पक्षपातीपणे सोडवणे.
 द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ. यातील एक सभागृह जनतेचे प्रतिनिधित्व करेल मात्र दुसरे सभागृह घटकराज्यांचे प्रतिनिधित्व करेल.
भारतीय घटनाकारांनी ही पाचही वैशिष्ट्ये आपल्या राज्यघटनेत स्वीकारली. केंद्र-राज्य यांना स्वतंत्र अस्तित्व दिले, अधिकारांची विभागणी करण्यासाठी संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूची निर्माण केली. स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करून घटनेचा अन्वयार्थ लावण्याची व संघ–राज्यांतील वाद सोडवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आणि राज्यसभा हे राज्यांचे प्रतिनिधिगृह म्हणून लोकसभेसोबत संसदेचा अविभाज्य भाग बनवले.
अमेरिकन संघराज्य हे राज्यांनी एकत्र येऊन निर्माण केले. स्वाभाविकपणे राज्यांनी स्वतःकडे अधिक अधिकार ठेवले. सुरुवातीला अनेक भारतीय नेत्यांना अशा संघराज्याची निर्मिती भारतासाठी व्हावी असे वाटत होते. घटना समितीमधील काहीजणही याच मताचे होते. किमान अधिकार (उदा. परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, चलन इ.) केंद्राकडे ठेऊन अन्य सर्व अधिकार राज्यांकडे द्यावे, असे त्यांचे मत होते. मात्र देशाच्या फाळणीमुळे चित्र बदलले. धर्माच्या आधारावर देश विभाजित झाला. संस्थानांच्या विलीनीकरणाचेही मोठे आव्हान होते. भाषिक राज्यांच्या मागण्या जोर धरत होत्या. या पार्श्वभूमीवर घटनाकारांनी प्रबळ केंद्राची निर्मिती देशाच्या अखंडतेसाठी अधिक महत्त्वाची मानली. त्यामुळे प्रबळ राज्यांपेक्षा प्रबळ केंद्र असणारे कॅनडाचे संघराज्य प्रतिमान घटनाकारांना जास्त योग्य वाटू लागले. स्वातंत्र्याच्या काळातील राष्ट्रउभारणीच्या विविध आव्हानांचा विचार करून प्रबळ केंद्र असलेल्या संघराज्याची निर्मिती घटनाकारांनी केली. हे अनेक तरतुदींवरून दिसून येते.
उदाहरणार्थ –
 संघसूचीमधील विषयांची संख्या अधिक आहे, तसेच हे विषय अधिक महत्त्वाचे आहेत.
 राज्यसूचीमधील विषयांवर राज्यसभेच्या संमतीने संसद कायदा बनवू शकते.
 राज्यपाल हा घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. पण त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
 आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार केंद्राला आहे. या काळात राज्यांचे अधिकार केंद्राकडे जातात.
 अखिल भारतीय सेवांची तरतूद इत्यादी.
अशा अनेक तरतुदींवरून केंद्र शासन राज्यांपेक्षा प्रबळ आहे हे स्पष्ट होते. काही घटनेच्या अभ्यासकांनी भारतीय संघराज्य हे खरे संघराज्य नाही, अशी टीका केली. आपल्या घटनाकारांनी राज्यघटनेत ‘फेडरॅलिझम’ हा शब्दप्रयोग न करता ‘युनिअन ऑफ स्टेटस’ (राज्यांचा समूह) असा शब्द वापरला आहे. वरील टीकाकार टीका करताना अमेरिकन प्रतिमान नजरेसमोर ठेवत असल्याचे दिसते. पण भारताच्या गरजेनुसार योग्य ते बदल करून घटनाकारांनी भारतीय संघराज्य घडवले आहे. संघराज्याच्या मुलभूत व्यवस्थेचा स्वीकार करताना आवश्यक ते बदलही त्यात केले, यात काहीही वावगे नाही. त्यामुळे भारतीय संघराज्य हे कोणत्याही अन्य देशाची नक्कल नसून ते स्वयंभू आहे. डी. डी. बासू या अभ्यासू घटनातज्ज्ञांनी म्हटले आहे की भारतीय संघराज्य हे

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...