Friday, 29 April 2022

महाराष्ट्राचे स्थान (महाराष्ट्र राजकीय व प्रशासकीय)

महाराष्ट्राचे स्थान (महाराष्ट्र राजकीय व प्रशासकीय)

1 महाराष्ट्र नागरी प्रशासन :-
1.1 १. महानगरपालिका :
1.2 2. नगरपालिका :
1.3 3. कटक मंडळे :
2 महाराष्ट्र ग्रामीण प्रशासन :-
2.1 1) जिल्हा परिषद :
2.2 2) पंचायत समिती : ३५१
2.3 3) ग्राम पंचायती\: २८,३३२ (खेडेगावांची संख्या : ४३,६६३)

स्वातंत्रोत्तर काळात १९५६ मध्ये देशात भाषावर प्रांत रचनेनुसार राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार आंध्रप्रदेश हे भाषिक तत्वावर आधारित पहिले राज्य अस्तित्वात आले. याच पुनर्रचनेनुसार राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. याच पुनर्रचनेने हैद्राबाद संस्थानातील मराठी भाषिक पाच जिल्हे (औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड) व मध्य प्रांतातील विदर्भाचे मराठी भाषिक आठ जिल्हे ( बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, चांदा) व बॉम्बे प्रेसिडेंसिमधील १३ जिल्हे असे २६ जिल्हे आणि गुजरात यांचे मिळून १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. परंतु मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी असल्यामुळे तत्कालीन द्वैभाषिक राज्यामध्ये आंदोलने झाली.

सरतेशेवटी राज्यातील १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मराठी भाषिकांकरिता गुजरात वगळता २६ जिल्हे असणारे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले.

____________________________

१. महानगरपालिका :

राज्यात तीन लाख लोकसंख्येकरिता महानगरपालिका स्थापन करण्यात येते व या महानगरपालिकांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ यानुसार चालतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेकरिता मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८. राज्यात सध्यस्थितीत २६ महानगरपालिका असून बृहन्मुंबई महापालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे.

विभागमनपा संख्या महापालिकानागपूर 2नागपूर, चंद्रपूर अमरावती 2अमरावती, अकोला औरंगाबाद 4औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड – वाघाळा पुणे 5पुणे, पिंपरी -चिंचवड, सांगली -मिरज – कुपवाडा, सोलापूर, कोल्हापूर नाशिक 5नाशिक, अहमदनगर, मालेगाव, धुळे, जळगाव मुंबई (कोकण)9बृहन्मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, वसई – विरार, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल 

राज्यातील २७वी व कोकण विभागातील ९वी महापालिका रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे नव्याने स्थापन करण्यात आली आहे.

2. नगरपालिका :

राज्यात सद्यस्थितीत २३४ नगरपालिका व १२४ नगरपंचायती असून त्यांचा कारभार महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ नुसार चालतो. राज्यातील नगरपालिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात येते.

नागरपरिषदांचे वर्गीकरण लोकसंख्यानिहाय करण्यात येते.

3. कटक मंडळे :

लष्कराची छावणी असलेल्या ठिकाणी कटक मंडळे स्थापन केली जातात. तेथील प्रशासन लष्कराच्या प्रशासकाद्वारे (कटक मंडळ कायदा १९२४ नुसार ) बघितले जातात. सध्यस्थितीत भारतात असणाऱ्या ६२ कटक मंडळांपैकी महाराष्ट्रातील कटक मंडळांची संख्या ७ आहेत.

जिल्हा कटकमंडळे अहमदनगर अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्ड औरंगाबाद औरंगाबाद कॅंटोन्मेंट बोर्ड पुणे देहू रोड, खडकी, पुणे नाशिक देवळाली नागपूर कामठी 

महाराष्ट्र ग्रामीण प्रशासन :-

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रशासनासाठी महाराष्ट्राने त्रिस्तरीय रचनेचा स्वीकार केलेला असून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार राज्यातील ग्रामीण प्रशासनाचे कामकाज चालते.

1) जिल्हा परिषद :

त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था. महाराष्ट्रात सध्यस्थितीत मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे.

2) पंचायत समिती : ३५१

3) ग्राम पंचायती\: २८,३३२ (खेडेगावांची संख्या : ४३,६६३)

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग 6महाराष्ट्रातील जिल्हे 36महाराष्ट्रातील तालुके (मुंबई उपनगरसह)358महाराष्ट्रातील महापालिका 27महाराष्ट्रातील नगरपालिका 234महाराष्ट्रातील नगरपंचायती 124महाराष्ट्रातील जिल्हा परिषद 34महाराष्ट्रातील पंचायत समिती 351

___________________________

No comments:

Post a Comment