Tuesday, 19 April 2022

ला रोडा बुद्धिबळ स्पर्धा - भारताच्या गुकेशला अजिंक्यपद.


💦भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने स्पेन येथे झालेल्या ४८व्या ‘ला रोडा’आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

💦१५ वर्षीय गुकेशने नऊ फेऱ्यांमध्ये अपराजित राहताना एकूण आठ गुणांसह ही स्पर्धा जिंकली. गुकेशला सात सामने जिंकण्यात यश आले, तर त्याचे दोन सामने बरोबरीत सुटले. त्याने अखेरच्या फेरीत इस्राइलच्या व्हिक्टर मिखालेव्स्कीवर मात करत अग्रस्थान मिळवले. दुसऱ्या स्थानावरील अर्मेनियाच्या हेक मार्तिरोस्यानच्या खात्यावर ७.५ गुण होते. गुकेशने या स्पर्धेत मिखालेव्स्कीसह अल्बेर्तो हर्नाडेझ रॅमोस, डॅनिएल रोमेरो पलारेस, हाविएर बेर्नाबेऊ लोपेझ कार्लोस, जॉर्ज रेन्टेरिया आणि नाहुल गवारेते यांना पराभूत केले.

💦गुकेशचा सहकारी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेअंती प्रज्ञानंदसह अन्य चार खेळाडूंचे सात गुण होते. मात्र, टायब्रेकमधील सरस गुणांच्या बळावर प्रज्ञानंदला तिसरे स्थान मिळाले. सहाव्या फेरीत प्रज्ञानंद आणि गुकेश आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रज्ञानंदला विजयाची संधी होती. मात्र, गुकेशने दमदार पुनरागमन केल्यामुळे ४१ चालींअंती हा सामना बरोबरीत सुटला. प्रज्ञानंदने अखेरच्या फेरीत हेक मार्तिरोस्यानवर २६ चालींमध्ये विजय मिळवला. गुकेशप्रमाणचे प्रज्ञानंदही या स्पर्धेत अपराजित राहिला.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...