Sunday, 24 April 2022

एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय

एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय


महाराष्ट्र राज्यातील ६ वर्षांखालील बालकांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करणे हे आयसीडीएस आयुक्तालयाचे दायित्व आहे. 

एकात्मिक बाल विकास सेवा लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाला-पूर्व शिक्षण यांची संकलित सेवा पुरवू इच्छिते. लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि

म्हणूनच हा उपक्रम किशोरावस्थेतील मुली, गरोदर महिला तसेच स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

६ वर्षा खालील गरीब लहान मुलांच्या आरोग्य आणि पोषणचा दर्जा वृध्दीगंत करणे

लहान मुलांच्या सुयोग्य संतुलित मानसिक, शाररिक आणि सामाजिक विकासाचा पाया तयार करणे.
लहान मुलांमधील आकस्मिक मुत्यूचे प्रमाण कमी करणे,

कुपोषण आणि शाळा बाह्यतेला प्रतिबंध करणे.
राज्यातील मुलांच्या विकासाच्या उद्देशाने विविध शासकीय उपक्रम आणि योजना राबविणाऱ्या विविध शासकीय विभागामध्ये धोरण सुनिश्चिती आणि अंमलबजावणी करण्याकरिता समन्वय साधणे.

राज्यातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मुल्यांची माहिती आणि प्रशिक्षण देणे जेणे करून  मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या क्षमता वृध्दीगंत होतील.

लहान मुलांच्या मातांना आणि गर्भवती महिलांना देखील पोष्टिक आहार पुरविणे.

आयसीडीएसच्या सुविधा आयसीडीएसच्या केंद्रांच्या मार्फत  पुरविण्यात येतात, ज्यास “अंगणवाडी”   म्हणून ओळखले जाते.

लहान मुलांची चांगली देखभाल आणि विकासाचे केंद्र, जे कमीत कमी खर्चात स्थानिकपातळीवरील उपलब्ध साधन सामुग्रीतून अगदी अंगणातच चालविता येते अशी अंगणवाडीची संकल्पना आहे.


अंगणवाडी केंद्र हे “अंगणवाडी कर्मचारी” (AWW) आणि “अंगणवाडी सहायिका” (AWH) चालवितात. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...