Thursday, 14 April 2022

डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

१ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय ?
🎈डाॅ.भिमराव रामजी आंबेडकर

२ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी व कोठे झाला ?
🎈१४ एप्रिल १८९१,महू.

३ )डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरू कोण ?
🎈तथागत बुद्ध,संत कबीर,महात्मा जोतीराव फुले.

४ ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक कोणी दिले ?
🎈कृष्णाजी अर्जून केळूस्कर.

५ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्रातील डाॅक्टरेट पदव्या कोठून मिळवल्या ?
🎈कोलंबिया विद्यापीठ अमेरिका,लंडन
स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स.

६ ) उस्मानिया विद्यापीठ हैदराबादने डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना कोणती
पदवी दिली ?
🎈डी.लिट्.

७ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाची मानध एल.एल.डी.पदवी केव्हा स्विकारली ?
🎈५ जून १९५२.

८ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कोठून निवडून आले ?
🎈पश्चिम बंगाल प्रांत.

९ ) भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण ?
🎈डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

१० ) भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?
🎈 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

११ ) संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ?
🎈९ डिसेंबर १९४६.

१२ ) भारतीय संविधान निर्मितीस एकूण किती कालावधी लागला ?
🎈२ वर्षे ११ महिने १८ दिवस.

१३ ) भारतीय संविधान केव्हा स्विकारले गेले ?
🎈२६ नोव्हेंबर १९४९.

१४ ) भारतीय संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो ?
🎈२६ नोव्हेंबर.

१५ ) भारतीय संविधान केव्हा अंमलात आले ?
🎈२६ जानेवारी १९५०.

१६ ) प्रजासत्ताक दिन का साजरा करतात ?
🎈भारतीय संविधान अमलांत आले म्हणून.

१७ ) भारतीय संविधानानुसार देशाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत ?
🎈राष्ट्रपती.

१८ ) भारतीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते ?
🎈संसद.

१९ ) भारताचे राष्ट्रपती संसदेचे अविभाज्य घटक असतात काय ?
🎈होय.

२० ) भारतीय घटनेनुसार संसदेचे वरीष्ठ सभागृह कोणते ?
🎈राज्यसभा.

२१ ) संविधानाची उद्देशिका काय दर्शवते ?
🎈स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय.

२२ ) १९२० च्या मानगांव परिषदेत "हाच आता तुमचा भावी नेता"अशा शब्दांत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख कोणी करून दिली ?  
🎈राजर्षी छत्रपती शाहू महाराज.

२३ ) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?      
🎈डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

२४ ) 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' ही घोषणा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी कधी व कोठे केली ?
🎈१३ ऑक्टोबर १९३५,येवले.

२५ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दिक्षा कधी व कोठे घेतली ?
🎈१४ ऑक्टोबर १९५६,नागपूर.

२६ ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणते पाक्षिक सुरू केले ?
🎈 मूकनायक .

२७ ) 'दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली ? 
🎈डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

२८ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 'बोधिसत्व' ही पदवी कोणी दिली ?
🎈बौद्ध भिक्खूंनी.

२९ ) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता संदेश दिला ?         
🎈शिका ! संघटीत व्हा !! संघर्ष करा !!!

३० ) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोठे व केव्हा झाले ?
🎈दिल्ली,६डिसेंबर १९५६.

🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

No comments:

Post a Comment