Wednesday, 27 April 2022

विषय : मराठी

*💥 विषय : मराठी*

*1) अयोग्य जोडी निवडा. ?*

   अ) विरोधीदर्शक    -  उंहू
   ब) शोकदर्शक    -  अगाई
   क) मौनदर्शक    -  गुपचित

1) अ     
2) ब     
3) क     
4) *यापैकी नाही ☑*

*2) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा. ?*

1) *रीती भूतकाळ ☑*
2) रीती वर्तमानकाळ 
3) पूर्ण वर्तमानकाळ 
4) साधा वर्तमानकाळ

*3) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. ?*

1) कविता   
2) *कवयित्री ☑*
3) कवित्री
4) कवियित्री

*4) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखेच राहते. ?*

अ) कागद   
ब) आज्ञा    
क) उंदीर     
ड) विद्या

1) ब, क, ड   
2) *अ, ब, क, ड ☑*
3) अ, क, ड   
4) अ, ब, ड

*5) ‘मुलांना’ या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?*

1) मुला   
2) *मुलां ☑*
3) मुलींना   
4) मुलाला

*6) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ?*

1) दाशी   
2) *दासी ☑*
3) माळीण   
4) मादी

*7) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.?*

अ) शहारे   
ब) हाल     
क) केळे     
ड) रताळे

1) *अ आणि ब ☑*
2) अ आणि ड   
3) अ, क आणि ड   
4) फक्त ड

*8) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?*

1) *कुत्र्या ☑*
2) कुत्री     
3) कुत्रे     
4) कुत्रि

*9) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?*

1) सात   
2) नऊ     
3) *आठ ☑*
4) दहा

*10) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा. ?*

1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल 
2) *पाऊस पडेल ☑*
3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते   
4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...