केंद्रीय लोकसेवा आयोग
घटना कलम क्र. 315 नुसार केंद्र आणि राज्य सरकार यांना प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक असणार्या पदांच्या निर्मितीसाठी लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे.
लोकसेवा आयोगाचा अद्देश : अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.
रचना : केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि राष्ट्रपती ठरवतील तीतके सदस्य असतात.
नेमणूक : भारताचे राष्ट्रपती करतात (पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सल्ल्याने)
शपथ : राष्ट्रपती देतात
राजीनामा : राष्ट्रपतींकडे
कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 65 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर राहतात.
लोकसेवा आयोगाचे कार्य :
केंद्रसरकारला कर्मचार्यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे.
केंद्रसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे.
मुलकी अधिकार्यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे.
अधिकार्याची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी सरकारकडे सादर करणे.
राष्ट्रपतीनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.
No comments:
Post a Comment