Sunday, 3 April 2022

पर्जन्य आणि उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार:

पर्जन्य 👇
      आफ्रिकेतील कांगो नदीखोरे व दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीखोऱ्यातील विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पर्जन्य पडतो.

🌺 आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरुपाचा पर्जन्य आहे.

🌺 आरोह पर्जन्याचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे.

🌺 प्रतिरोध पर्जन्य जगातील सर्वाधिक प्रदेशांत पडतो.

🌺 समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आवर्त पाऊस अधिक पडतो.
१ चौकिमी प्रदेशावर १ मिमी पाऊस पडल्यास, त्यापासून १० लाख लिटर पाणी मिळते.

🌺 १२० मिमी बर्फाचा थर हा १० मिमी पावसाइतका असतो.

🌺 ईशान्यकडील मॉसिनराम येथे प्रतिरोध पर्जन्य जगातील सर्वाधिक प्रदेशांत पडतो.



उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार:

१)केंद्रीय ज्वालामुखी : 

      ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो ,तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात
या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडलेले पदार्थ नळीच्या मुखाभोवती साचतात .त्यामुळे शंकूच्या आकाराच्या ज्वालामुखीय पर्वतांची निर्मिती होते.उदा.किलीमांजारो तांझिया

२)भेगीय ज्वालामुखी :

       ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगातून बाहेर पडतो , त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात .या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांभोवती साचतात .त्यामुळे ज्वालामुखीत पठाराची निर्मिती होते उदा. महाराष्ट्र पठार

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...