जमशेदजी टाटा
(३ मार्च १८३९ - १९ मई १९०४)
भारत के महान उद्योगपति तथा विश्वप्रसिद्ध औद्योगिक घराने टाटा समूह के संस्थापक थे।
टाइम्स ऑफ़ इंडिया के एडिटर (1907-1923) सर स्टैनले रीड ने कहा था, ‘सिर्फ एक ही शख्स था जिसने हौसले के साथ भविष्य को देखा और जिसने बाकियों से अलग, पूर्ण अर्थव्यवस्था पर विचार किया. ये थे, जमशेदजी नुसरवानजी टाटा.’ जमशेगजी को उनकी चार उपलब्धियों के लिए हमेशा याद किया जाएगा- स्टील उत्पादन इकाइयों की स्थापना, जल विद्युत (हाइड्रो-इलेक्ट्रिक) ऊर्जा का उत्पादन, भारतीय विज्ञान संस्थान और होटल ताज महल का निर्माण
भारतीय राजकारणातील भीष्माचार्य
दादाभाई नौरोजी
(रोमन लिपी: Dadabhai Naoroji ;) (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; मृत्यू : महालक्ष्मी-मुंबई, ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.
आत्माराम पांडुरंग तर्खडकर
(जन्म २३ डिसेंबर १८२३[१] - मृत्यू २६ एप्रिल १८९८)
तथा डॉ. आत्माराम हे परमहंससभेच्या संस्थापकांपैकी एक होते. तसेच ते प्रार्थना समाजाचेही संस्थापक सदस्य होते. ते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. ते मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे धाकटे भाऊ होते.
गोपाळ गणेश आगरकर
(जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : १७ जून १८९५)
हे महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान-निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला. असा लेख लिहिण्याचे धारिष्ट्य त्यापूर्वी कोणाचे नव्हते. बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.
No comments:
Post a Comment