Tuesday, 5 April 2022

क्रांतिवीर खाज्या  नाईक

                                            खाज्या नाईक हे १८३१ ते १८५१ पर्यंत ब्रिटीशांच्या नोकरीत होते. ते सेंधवा घाटच्याभागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे अतिकठीण कार्य करीत. घनदाट जंगलातून जाणाऱ्या बैलगाड्यांचे सौरक्षण करणाऱ्या पोलीस पथकाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हातातून एक लुटारू मारला गेला व त्या कारणासाठी त्यांच्यावर खटला भरून १० वर्षे सजा देण्यात आली.१८५५ ला  शिक्षा भोगून आल्यावर आपल्याला नोकरीत परत घ्यावे आशी विनंती त्यांनी सरकारला केली,परंतु ती बाद झाली पण १८५७ साली वातावरण तापू लागले तसे ब्रिटिशांना खाज्या नाईकांची गरज भासू लागली परंतु आता ते दुसऱ्याच प्रेरणेने भारले गेले होते. ते दिल्लीच्या बादशहाच्या संपर्कात होते व सूचना मिळताच त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यांच्या सोबतीला भीमा नाईक, मेवाश्या नाईक होते, त्यांनी ७००-८०० भिल्लांना जमा करून गावच्या गावे लुटायला सुरुवात केली व ब्रिटिशांना युद्धाचे आवाहन केले तेव्हा त्यांना हनुमंत राव भिल्ल येऊन मिळाला. आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दहशत निर्माण करून सेंधवा घाटावर काब्ज्जा करून ब्रिटीशांच्या एवजी स्वतः कर वसूल करण्यास सुरुवात केली.               

                 होळकरांच्या राज्यातून ब्रिटिशांनी गोळा केलेलीखंडणी मुंबईला जात होती ती खाज्या नाईकांनी लुटली ती जवळ जवळ ७००००० रुपये होती, व त्याचे रक्षण ३०० सैनिक करीत होते पण त्यांनी खाज्यांना किंवा त्यांच्या कोणत्याही भिल्ल सैनिकाला विरोध केला नाही. एवढा मोठा धक्का ब्रिटिशांना कोणीही दिला नव्हता. ब्रिटीशांचे धाबेच दणाणले व जर खाज्या नाईकांचा बंदोबस्त केला नाही तर सत्ता टिकणार नाही याची त्यांना खात्री पटली.

                खाज्या नाईकांच्या दलात आता महादेव नाईक व दौलत नाईक हि येऊन मिळाले, अक्राणी महाल भागात ब्रिटिशांच्या विरुद्दः उभे राहिलेले काळूबाबा नाईक ही आता खाज्यांना येऊन मिळाले त्याच प्रमाणे होळकरांच्या धार संस्थानातील रोहिले, मकरानी व अरब सैन्य ही आता खाज्यांना येऊन मिळाले. आता भिल्ल सेना चोहोबाजूने ब्रिटीशांच्या विरोधात उठली होती, "सुलतानपुरच्या" भिल्ल सेनेने " सारंगखेडा " गावावर हल्ला चढविला व ब्रिटिशांना सडो कि पडो करून सोडले. मंदाने गावाचे रुमाल्या नाईक ही ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करत होते.

                आता ब्रिटिशांनी उठाव दडपण्या साठी शर्तीचे प्रयत्न सुरु केलेले होते. जिल्ह्यात सैनिकांच्या  पलटनी वाढवल्या गेल्या त्याच प्रमाणे अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नेमनुकीही करण्यात आल्या. व त्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले. एवढेच नाही तर भिल्लांशी लढण्या साठी भिल्लाचेच बांधव असलेले महदेव कोळी जमातीची पलटण तयार करण्यात आली होती. आता भिल्लांना जागोजागी घेराव घातला जात होता व त्यांची ताकद कमी करण्यात येत होती. अश्यातच मेजर ईव्हान्स ला खाज्या व त्याचे ३००० साथीदार हे बडवानी च्या जवळ आम्बापानीच्या जंगलात आश्रयाला असल्याची खबर लागली व त्यांनी भिल्लांना घेराव टाकला. पण जर शरण येतील ते भिल्ल कसले त्यांनी जवळ असलेल्या दगडांच्या व भिल्खीच्या आधारे व काही बंदुकांच्या आधारे लढण्यास सुरुवात केली, परंतु ब्रीतीशांच्या तैनाती फौजा व अत्याधुनिक बंदुकांपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते तरीही त्यांनी मोठ्या हिम्मतीने लढाई करून ब्रिटीशांचे दोन अधिकारी व १६ सैनिक मारले. भिल्लांची खूप हानी झाली. ४६० स्त्री व पुरुषांना कैद करण्यात आले. खाज्या नाईक, मेवाश्या नाईक, भाऊ रावल यांच्या बायकांना कैद झाली व खाज्या नाईकांचा मुलगा " पोलाद्सिंग" हा 'शहीद' झाला. पकडलेल्या कैद्यान्पाकी ५५ कैद्यांना जागेवरच गोळ्या घालून मारण्यात आले.

             आपल्या असंख्य साथीदारांची कत्तल, कुटुंबाची वाताहत पाहूनही खाज्या खचले नव्हते. ते सतत ब्रिटीशांसी लढत राहिले, शेवटी ब्रिटिशांनी त्यांना एकाकी पाडण्यात यश मिळविले व सशर्त माफी मागावी व धुळ्याच्या कल्लेक्टरास शरण यावे म्हणून फर्मान काढले. परंतु त्यांनी सशर्त माफी मागण्यास नकार देऊन संपूर्ण माफी जर देत असाल तर आम्ही शरण येऊ असे उलट उत्तर दिले. हा ब्रिटीशांचा अपमान होता त्यामुळे बोलणे फिसकटले व त्याचा काहीही उपयोग झाला नाही खाज्या नाईकांनी २६/१०/१८५७ ला शिरपूर लुटले व ब्रिटीशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांच्या बरोबर फक्त १५० भिल्ल होते. १७/११/१८५७ साली परत खाज्या नाईक व भीमा नाईक यांनी ७००००० चा ब्रिटीशांचा खजिना लुटला.

              दिनांक ११ एप्रिल १८५८ रोजी खाज्या नाईक , दौलतसिंग नाईक, काळूबाबा नाईक याच्यासह १५०० भिल्ल सैनिकांना मेजर ईव्हान्सने आम्बापानीच्या जंगलात घेराव घालून हल्ला केला त्याचा बरोबर ब्रिटीशांची मोठी तैनाती फौज व अत्याधुनिक शास्त्रे होती.युद्धात   ६५ लोक मारले गेले.  खाज्या नैकांसाहित ५७ लोकांना ड्रमच्

या आवाजावर गोळ्या घालण्यात आल्या व त्यांचे शीर कापून सेन्धाव्याच्या किल्ल्याबाहेर लात्कावण्यात आले कि पुन्हा जर कोणी उठाव केला तर त्याची हाल असे होतील म्हणून व ४० स्त्रीयांना अटक झाली ही लढाई १८५७ च्या समरातील " आम्बापानीची लढाई " म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या लढाईचा उल्लेख कोणत्याही शैक्षणिक पुस्तकात जाणीव पूर्वक टाळल्याचे लक्षात येते, हे फार मोठी शोकांकिका आहे कि आजच्या आदिवासी तरुणाला " खाज्या नाईकांचे " नाव ही माहित नाही, त्यांच्या बलिदानाचे महत्व तर खूप दूरची गोष्ट आहे.





No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...