Sunday, 10 April 2022

आजचे प्रश्नसंच

1)आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने “राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान” याची स्थापना करण्यास मान्यता दिली. त्याच्यासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:

1. राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान हा ग्रामीण विकास मंत्रालयाचा एक उपक्रम आहे.

2. अभियानाचा अंमलबजावणीचा कालावधी वित्त वर्ष 2020-21 ते 2024-25 पर्यंत म्हणजेच पाच वर्षांचा असणार.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2).  √

2)28 फेब्रुवारी रोजी विज्ञान भवन येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात आहे. 2020 या वर्षी या दिनाची संकल्पना काय आहे?
(A) विमेन इन सायन्स.  √
(B) युथ इन सायन्स
(C) NRIs अँड सायन्स
(D) विमेन, सायन्स अँड स्पोर्ट्स

3)केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्री ह्यांच्या हस्ते ‘प्रशासकांसाठी उच्च शिक्षण नेतृत्व विकास कार्यक्रम’ याचे उद्घाटन करण्यात आले. त्याच्यासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:

1. हा ब्रिटन-भारत शिक्षण व संशोधन पुढाकार (UKIERI) अंतर्गत चालविण्यात येणारा विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि ब्रिटिश कौन्सिल या संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे.

2. हा उपक्रम भारतभर शालेय शिक्षकांसाठी नेतृत्व विकासाच्या संदर्भात कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे उद्दीष्ट ठेवते.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा:

(A) केवळ (1).  √
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

4)कोणत्या मंत्रालयाने “मार्केट इंटेलिजेंस अँड अर्ली वॉर्निंग सिस्टम” (MIEWS) सादर केली?
(A) कृषी मंत्रालय
(B) ग्रामीण विकास मंत्रालय
(C) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय.  √
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

5)‘रिस्पॉन्सीबल AI फॉर सोशल एंपॉवरमेंट 2020’ (RAISE 2020) ही परिषद _ या शहरात घेण्यात येणार.
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली.  √

6)कोणत्या ठिकाणी भारतीय हवाई दल (IAF) आणि रॉयल एअर फोर्स (RAF) यांचा पाचवा संयुक्त ‘इंद्रधनुष सराव’ आयोजित करण्यात आला?
(A) हिंदन हवाई तळ.  √
(B) जलाहल्ली हवाई तळ
(C) अंबाला हवाई तळ
(D) अवंतीपूर हवाई तळ

7)________ या शहरात ‘वैद्यकीय क्षेत्राच्या आयुर्वेद, युनानी आणि सिद्धा प्रणालीमधल्या निदान आणि परिभाषा यांचे मानकीकरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ पार पडली.
(A) बंगळुरू
(B) नवी दिल्ली.  √
(C) गोवा
(D) चेन्नई

8)______ या शहरात ‘किनारपट्टी आपत्ती निवारण व स्थितिस्थापकत्व विषयक परिषद’ आयोजित करण्यात आली.
(A) नवी दिल्ली.  √
(B) गोवा
(C) शिमला
(D) चेन्नई

9)‘वर्ल्ड एअर क्वालिटी रीपोर्ट 2019’ या अहवालानुसार, कोणता देश जगातला पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला?
(A) भारत
(B) बांग्लादेश.  √
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान

10)‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ऑलिव्ह रिडले कासव फक्त हिंद महासागरामध्येच आढळतात.

2. ऑलिव्ह रिडले कासव ही प्रजाती ‘आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि नैसर्गिक संसाधने संवर्धन संघ (IUCN) रेड लिस्ट’ यामध्ये ‘असुरक्षित’ गटात ठेवण्यात आली आहे.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

____________________

No comments:

Post a Comment