Sunday, 10 April 2022

पोलिस प्रशासन बद्दल माहिती,महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती

पोलिस प्रशासन बद्दल माहिती

12 डिसेंबर 1867 रोजी मुंबई ग्रामीण मुलकी पोलिस कायदा संमत करण्यात आला.
1963 मध्ये मुंबई ग्रामीण मुलकी पोलिस कायदा रद्द करण्यात आला.
22 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्र ग्रामीण मुलकी कायदा संमत करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुलकी व सामन्य प्रशासनाच्या दृष्टीने सहा विभाग केलेले आहेत. यांना महसूल विभाग असे सुद्धा म्हणतात.
प्रत्येक विभागाचा प्रमुख विभागीय आयुक्त असतो.
ग्रामीण मुलकी प्रशासनाची रचना :-

विभागीय आयुक्त = विभाग
जिल्हाधिकारी = जिल्हा
प्रांत अधिकारी = जिल्ह्याचा काही भाग
तहसीलदार = तालुका/तहसील
तलाठी = गाव

______________________

महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती



3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.


महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.


महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.


महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.


महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.


महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.


महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.


आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.


महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.


महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.


महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.


सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत.


पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.


________________________

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...