Wednesday 13 April 2022

काही प्रश्न अर्थशात्राचे आणि अर्थसंकल्पाचे प्रकार

१. नाबार्ड खालीलपैकी कोणाला पुनर्वित्त पुरवठा करते?

भूविकास बँका
प्रादेशिक ग्रामीण बँका
राज्य सरकार
वरील सर्व
उत्तर – वरील सर्व

२. आफ्रिकन देशांपैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशाशी आहे?

नायजेरिया
झिंबाब्वे
दक्षिण आफ्रिका
सुदान
उत्तर – दक्षिण आफ्रिका

३. लोक अंदाज समिती मध्ये किती सदस्य असतात?

7
15
22
30
उत्तर – 30

४. सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला ……… असे म्हणतात.

मौद्रिक धोरण
द्रव्य निर्मिती
राजकोषीय धोरण
चलन विषयक धोरण
उत्तर – राजकोषीय धोरण

५. खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही?

निर गुंतवणुकीतून प्राप्त झालेला नफा
निव्वळ देशी कर्जे
व्याज खर्च
लोक लेख्यातील जमा
उत्तर – व्याज खर्च

६.डेअरी ही आर्थिक कामकाजाच्या कोणत्या विभागात येते?
तृतीयक विभाग
प्राथमिक विभाग
द्वितीयक विभाग
पाक्षिक विभाग

Option 2 : प्राथमिक विभाग
Solution

ज्या कामकाजातून उत्पन्न निर्माण होते त्याला आर्थिक कामकाज असे म्हणतात.
आर्थिक कामकाजाच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्थेचे ढोबळ मानाने 3 भागांत विभाजन होते. प्राथमिक विभाग, द्वितीयक विभाग व तृतीयक विभाग हे ते तीन विभाग होत.
डेअरी प्राथमिक विभागात मोडते.
प्राथमिक विभाग: प्राथमिक कामकाजासाठी पृथ्वीवरील संसाधनांचा थेट उपयोग होत असल्याने ही कामे थेट पर्यावरणावर अवलंबून असतात. त्यामुळे शिकार आणि गोळा करणे, पशुव्यवसायाशी संबंधित कामे, मासेमारी, मधुमक्षिकापालन इ. कामांचा यामध्ये समावेश होतो.
द्वितीयक विभाग :द्वितीयक विभागातील कामे कच्च्या मालापासून उत्पादने तयार करून नैसर्गिक संसाधनांचे महत्व वाढवतात.म्हणूनच, माल तयार करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि बांधकाम व्यवसायावर त्यांचा विशेष भर असतो. उदा. चपलांचा कारखाना.
तृतीयक विभाग : तृतीयक विभागात उत्पादन व देवाण- घेवाण या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. या उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सेवांचा  समावेश होतो. व्यापार, दळण-वळण आणि संवादासारख्या अंतर कमी करणाऱ्या गोष्टींचा या देवाण-घेवाणीमध्ये अंतर्भाव होतो. उदा.सल्ला -मार्गदर्शन

७.'सुवर्ण क्रांती चा संबंध  ________. आहे.
अनमोल खनिजे
डाळी
ज्यूट
फलोत्पादन आणि मध
Answer

Option 4 : फलोत्पादन आणि मध

फलोत्पादन आणि मध  हे उत्तर बरोबर आहे.

'सुवर्ण क्रांती' ही संकल्पना फलोत्पादन आणि मध  याच्याशी संबंधित आहे.
ही क्रांती 1991 साली सुरु झाली आणि 2003 पर्यंत चालली.
निरपाख तुताज हे सुवर्ण क्रांतीचे जनक आहेत.
सुवर्ण फायबर क्रांती ही संकल्पना ज्यूट उत्पादनाशी निगडीत आहे.

क्रांती संबंध
तपकिरी क्रांती - चामडी , कोको
हरित क्रांती - शेती उत्पादन
राखाडी क्रांती - खते
गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी
लाल क्रांती -मांस, टोमॅटो उत्पादन
वर्तुळ क्रांती- बटाटा उत्पादन
चांदी फायबर क्रांती-सुती उत्पादन
चांदी क्रांती-अंडे उत्पादन
धवल क्रांती - डेअरी, दूध उत्पादन
पीत क्रांती -तेलबिया उत्पादन
नील क्रांती- मत्स्योत्पादन
कृष्ण क्रांती -पेट्रोलियम उत्पादन

____________________

अर्थसंकल्पाचे प्रकार

* समतोल अर्थसंकल्प – जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च दोन्ही सारखे असतात तेव्हा त्या अर्थसंकल्पास समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.

* शिलकीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकी अर्थसंकल्प म्हणतात.

* तुटीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त असतो, तेव्हा त्या अर्थसंकल्पास तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...