🌸श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी सोमवारी १७ सदस्यांच्या नव्या मंत्रिमंडळाची नियुक्ती केली. पंतप्रधान महिंदराजपक्षे वगळता अध्यक्षांच्या इतर जवळच्या नातेवाईकांना या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. देशाला भेडसावणाऱ्या आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटामुळे अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांनी ‘व्यवस्था परिवर्तनाचे’ (सिस्टीम चेंज) आवाहन केले.
🌸देशव्यापी आणीबाणी व संचारबंदी यांचे उल्लंघन करून हजारो लोक सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरल्यानंतर, या महिन्याच्या सुरुवातीला अध्यक्ष गोताबया व त्यांचे मोठे भाऊ पंतप्रधान महिंदवगळता श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला होता.
🌸अध्यक्षांना विरोधी पक्षांच्या सदस्यांसह सहमतीचे सरकार स्थापन करता यावे यासाठी पूर्वीच्या मंत्रिमंडळाने मार्ग मोकळा करून दिला होता. तथापि, विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
🌸७२ वर्षांचे राजपक्षे यांनी सोमवारी १७ सदस्यीय मंत्रिमंडळाला शपथ दिली. तीन मंत्र्यांची त्यांनी याआधीच नियुक्ती केली होती.
🌸यापूर्वीच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री राजपक्षे कुटुंबातील ज्येष्ठतम सदस्य चामल राजपक्षे व महिंदूा यांचे पुत्र नमल राजपक्षे, तसेच राज्यमंत्री असलेले पुतणे शशींद्र यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा