Wednesday, 27 April 2022

लक्षात ठेवा ,भारतातील महत्त्वाच्या आयोगांचे अध्यक्ष


.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) महात्मा फुले यांचे सहकारी नारायणराव लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँडस् असोसिएशन सोसायटी' या नावाची गिरणी कामगारांची भारतातील पहिली संघटना स्थापना केली .....
- १८८४

🔹२) महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या आणि समाजपरि वर्तनाच्या दिशेने महात्मा फुले यांनी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना हे होय. महात्मा फुले यांनी पुणे येथे 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली ....
- २४ सप्टेंबर, १८७३

🔸३) .... या ग्रंथाद्वारे जोतीबा फुल्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले व त्यांच्या दुःखांना वाचा फोडली.
- शेतकऱ्याचा असूड

🔹४) जोतीबा फुले यांनी आपल्या .... या ग्रंथांमधून तथाकथित उच्चवर्णीयांकडून शूद्रातिशूद्रांची कशा प्रकारे पिळवणूक केली जाते, याचे विदारक दर्शन घडविले.
- ब्राह्मणांचे कसब व गुलामगिरी

🔸५) विधवाविवाहाला धार्मिक अधिष्ठान लाभावे म्हणून करवीर व संकेश्वराच्या शंकराचार्यांकडे दाद मागितली ....
- विष्णुशास्त्री पंडित

______________________________

.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) 'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणविल्या जाणाऱ्या, परंतु सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मात्र आपले प्रतिगामित्वच सिद्ध करणाऱ्या .... यांनी रानडे, फुले, आगरकर यांसारख्या कर्त्या समाजसुधारकांवर टीकेची झोड उठविली.
- विष्णुशास्त्री चिपळूणकर

🔹२) .... यांनी लिहिलेला 'अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन' हा संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहे.
- डॉ. रा. गो. भांडारकर

🔸३) गांधीजींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघातर्फे ११ फेब्रुवारी, १९३३ रोजी 'हरिजन' या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 'हरिजन'चे पहिले संपादक म्हणून कोणाचा निर्देश कराल ?
- आर. व्ही. शास्त्री

🔹४) स्त्रियांच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी पुण्यात 'आर्य महिला समाजा'ची स्थापना करणाऱ्या ..... या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत.
- पंडिता रमाबाई

🔸५) 'अॅम्स्टरडॅम' येथे भरलेल्या जागतिक उदारधर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा प्रबंध ..... यांनी वाचला.
- महर्षी वि. रा. शिंदे

________________________________

.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) २३°३०' ते ६६°३०' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान सूर्यकिरण थोडेसे तिरपे पडतात. त्यामुळे या भागात तापमान फार जास्त किंवा फार कमी नसते. या पट्ट्यास काय म्हणतात ?
- समशीतोष्ण पट्टा

🔹२) ६६°३०' ते ९०° अक्षवृत्त दरम्यानच्या प्रदेशास .... पट्टा म्हणतात.
- शीत पट्टा

🔸३) समुद्रसपाटीपासून उंचीनुसार तापमानात होणाऱ्या बदलास. तापमानाचे ...... वितरण असे म्हणतात.
- ऊर्ध्व

🔹४) विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना कमी-अधिक वायुदाबाचे पट्टे दिसून येतात. विषुववृत्तापासून ५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशात विषुववृत्तीय .... पट्टा पसरला आहे.
- कमी दाबाचा

🔸५) उत्तर व दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्तांदरम्यान .... पट्टा पसरला आहे.
- जास्त दाबाचा

_______________________________

🟠भारतातील महत्त्वाच्या आयोगांचे अध्यक्ष :-

🔹 पद          -           पदप्रमुख  🔸

🔸१)राष्ट्रीय महिला आयोग :- रेखा शर्मा

🔹२)राष्ट्रीय मानवी हक्क आयोग :- अरुण कुमार मिश्रा

🔸३)राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग :- सरदार इक्बाल सिंह लालपुरा

🔹४)राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग :- विजय सांपला

🔸५)राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग :-  हर्षल चव्हाण

🔹६)राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग :- भगवान लाल सहानी

🔸७)राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग :- प्रियांक कानूनगो

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...