Thursday, 14 April 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर..... एक गहन विचार......


डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे संपूर्ण कार्य हे माझ्या लेखणीने सांगता येणार नाही अर्थातच माझी बुद्धी सुद्धा एवढी सक्षम नाही की मी त्यांच्या बद्दल लिहू शकेल. मी माझे अवघे जीवनही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचण्यात घालवले तरी मी परिपूर्ण होऊ शकणार नाही.... पण तरीही छोट्याश्या हाताने व अपरिपूर्ण  ज्ञानाने डॉ बाबसाहेबाबद्दल लिहण्याचा प्रयत्न केला आहे.
               डॉ बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्त्व होते की त्यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारावर सम्पूर्ण जगाला चांगल्या आणि वाईट चे ज्ञान दिले. अर्थातच सर्वात मोठे संविधान आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील एक प्रसंग मुद्दाम सांगावासा वाटतो आहे.

मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.

          ही भीमगर्जना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. तेव्हा अक्षरशः सगळे हादरले होते. त्यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांच्या निर्णयाचे सगळ्याची स्वागत देखील केले
              बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करून दुसर्‍या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हां हां म्हणता सातासमुद्रापार गेली. आणि नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टांनी उभे जग पालथे घालत असणार्‍या अनेक धर्मांच्या धर्मगुरूंना मोठी संधी आयती चालून आल्याने आनंद झाला. अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावे यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्‍न चालू केले. अशा धर्मगुरूंकडून राजगृहावर देश विदेशांतून अक्षरश: पत्रांचा व तारांचा वर्षाव झाला होता. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही आमिषाला बळी न करता सगळ्या धर्माची चाचपणी केली ,विशेष अभ्यास देखील केला त्यानंतर त्यांनी कोणत्या धर्मात धर्मांतर करावे हा निर्णय घेतला हा निर्णय घ्यायला त्यांना कितीतरी कालावधी लागला पण त्यांनी अत्यंत विचाराणीशी धर्मांतर केले.
                 हा प्रसंग सांगण्याचे कारण की त्यांनी कोणत्याही धर्माला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानले नाही. त्यांनी वैचारिक शक्ती इथूनच दिसून येते. त्याची दूरदृष्टी ही त्यांच्या या निर्णयातून दिसून येते.
                 तुम्ही आम्ही काय शिकायला हवे??? त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग असेच आहेत जे आम्ही शिकायला हवे पण आम्ही एक दिवसच ते आत्मसात करतो, मग पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न.....डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातून आम्ही संयम, उदारता, प्रामाणिकपणा, सातत्य, जिद्द, उत्साह, कष्ट करण्याची वृत्ती, आणि शिकण्याची उत्कटता... अजूनही असे अनेक गुण आहेत असे म्हटल्यापेक्षा संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर च परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणता येईल जे आम्ही आत्मसात करायला हवे....पण माझा एक प्रश्न आहे....

आपण काय शिकतो??????

   

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...