Tuesday, 17 September 2024

वर्णमाला, नाम व त्याचे प्रकार:

वर्णमाला

तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालीकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ

मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.

स्वर
स्वरादी
व्यंजन

1. स्वर :

ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.
मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत.

वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.

र्‍हस्व स्वर,
दीर्घ स्वर,
संयुक्त स्वर
1. र्‍हस्व स्वर :

ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
उदा. अ, इ, ऋ, उ
2. दीर्घ स्वर :

ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
स्वरांचे इतर प्रकार

1. सजातीय स्वर :

एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
2. विजातीय स्वर :

भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ
3. संयुक्त स्वर :

दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
याचे 4 स्वर आहेत.

ए – अ+इ/ई
ऐ – आ+इ/ई
ओ – अ+उ/ऊ
औ – आ+उ/ऊ
2. स्वरादी :

ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
स्वर + आदी – स्वरादी

दोन स्वरादी – अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
दोन नवे स्वरदी : ओ, औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
उदा. बॅट, बॉल
स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात.

अनुस्वार,
अनुनासिक,
विसर्ग
क. अनुस्वार –

स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात.
उदा. गंगा, चंचल इत्यादी.
ख. अनुनासिक –

जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात.
उदा. घरात, जेंव्हा, फुफ्फुसांतील, यांतील, आंतील इत्यादी.
ग. विसर्ग –

विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब देतात.
उदा. स्वत:, दु:ख:, नि:स्पृह: इत्यादी.
3.व्यंजन :

एकूण व्यंजन 34 आहेत.

ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.

स्पर्श व्यंजन (25)
अर्धस्वर व्यंजन (4)
उष्मा, घर्षक व्यंजन (3)
महाप्राण व्यंजन (1)
स्वतंत्र व्यंजन (1)
1. स्पर्श व्यंजन :

एकूण व्यंजन 25 आहेत.

वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णाला स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
उदा.

क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

कठोर वर्ण
मृदु वर्ण
अनुनासिक वर्ण
1. कठोर वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
2. मृद वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
3. अनुनासिक वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ड, त्र, ण, न, म

______________________________


नाम व त्याचे प्रकार:


प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावालानामअसे म्हणतात.

उदा.

टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.


 नामाचे प्रकार :

नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

सामान्य नाम –


एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.

उदा.

मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.


सामान्य नाम विशेषनामपर्वतहिमालय, सहयाद्री, सातपुडामुलगास्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरवमुलगीमधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनीशहरनगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूरनदीगंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी

टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

विशेष नाम –


ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.

उदा.

राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.


टीप : (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नसल्यास सामान्य नाम समजावे.) 
उदा. या गावात बरेच नारद आहेत.

भाववाचक नाम –


ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

उदा.

धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.


टीप : (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्‍या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

   भाववाचक नामे साधण्याचे प्रकार –

सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणे –

शब्दप्रत्ययभाववाचक नामइतर उदाहरणेनवलआईनवलाईखोदाई, चपडाई, दांडगाई, धुलाईश्रीमंतईश्रीमंतीगरीबी, गोडी, लबाडी, वकिलीपाटीलकीपाटीलकीआपुलकी, भिक्षुकीगुलामगिरीगुलामगिरीफसवेगिरी, लुच्चेगिरीशांतताशांतताक्रूरता, नम्रता, समतामनुष्यत्वमनुष्यत्वप्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्वशहाणापण, पणाशहाणपण, पणादेवपण, प्रामाणिकपणा, मोठेपणसुंदरयसौदर्यगांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्यगोडवागोडवाओलावा, गारवा

नामाचे कार्य करणारे इतर शब्द :

टीप : नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी, सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत.

अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-

नियम –

1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.

उदा.

आत्ताच मी नगरहून आलो.


शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.


वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही  मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

2. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.

उदा.

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.


आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.


आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.


वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

3. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.

उदा.

शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे.


विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.


माधुरी उधा मुंबईला जाईल.


वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.

4. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.

उदा. 

आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.


या गावात बरेच नारद आहेत.


माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.


विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.

उदा. 

शहाण्याला शब्दांचा मार.


श्रीमंतांना गर्व असतो.


जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.


जगात गरीबांना मान मिळत नाही.


वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.

6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.

उदा.  

आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.


त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.


नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.


वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.

7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.

उदा.

ज्याला कर नाही त्याला डर कसली.


गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.


ते ध्यान पाहून मला हसू आले.


देणार्‍याने देत जावे.


वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येत.

आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.
त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली

यात नाम कोणते आहेत


No comments:

Post a Comment