Friday, 22 April 2022

AGRI-FORESTRY-ENGG prelims

नमस्कार मित्रांनो...

बरेच विद्यार्थी नवीन पद्धतीनुसार AGRI-FORESTRY-ENGG prelims चे पूर्व परीक्षेचे स्वरूप कसे असेल विचारत आहेत...

त्याबाबत थोडेसे...

याआधी कृषी सेवा पूर्व ला मराठी इंग्रजी आणि GS असा pattern होताच, forestry साठी मराठी -इंग्रजी- current-QR असा पॅटर्न होता..

त्यामुळे आता पूर्व साठी असणारा syllabus जरी मोठा दिसत असला तरीही या दोन परीक्षांचा ट्रेंड कदाचित आयोग तसाच ठेवण्याची शक्यता जास्त वाटते...

त्यामुळे माझ्या वैयक्तिक मतानुसार...
आताच्या नवीन syllabus नुसार तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा चे प्रश्न पत्रिका स्वरूप कदाचित असे असू शकेल...

1) मराठी - 20 प्रश्न - 40 गुण (एक passage विचारण्याची शक्यता ही नाकारता येत नाही)

2) इंग्रजी - 20 प्रश्न - 40 गुण (एक passage विचारण्याची शक्यता ही नाकारता येत नाही

3) सामान्य क्षमता चाचणी

A) चालू घडामोडी - 10 प्रश्न - 20 गुण
B) भारतीय राज्यव्यवस्था - 10 प्रश्न - 20 गुण
C) सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान - 15 प्रश्न - 30 गुण
D) भारत आणि महाराष्ट्र भूगोल - 10 प्रश्न - 20 गुण
E) maths /reasoning - 10 प्रश्न - 20 गुण
F) पर्यावरण - 5 प्रश्न - 10 गुण

एकूण - 100 प्रश्न - 200 गुण

(हा माझा वैयक्तिक अंदाज आहे..final पॅटर्न आयोगच ठरवणार आहे. तुम्हाला अभ्यासला  दिशा मिळावी म्हणून हा पॅटर्न नमूद केला आहे)

# मराठी -इंग्रजी कडे विशेष लक्ष असुद्यात
# general mpsc चे GS  विषय eg- polity, भूगोल, विज्ञान , current यामध्ये combine गट ब सारखा पॅटर्न असण्याची शक्यता आहे..
# remote sensing आणि  पर्यावरण PYQ वर भर द्यावा

# सर्वांना खूप शुभेच्छा...💐💐

No comments:

Post a Comment