Sunday, 3 April 2022

तांदूळ वाण 'IR-8' व हरितक्रांती ला 50 वर्षे पूर्ण झाली

आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI) ने 29 नोव्हेंबर 1966 रोजी IR-8 च्या नावाने तांदळाची एक जात शोधून काढली होती. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक बियाणे हे प्रति हेक्टर फक्त दोन टन भाताचे उत्पन्न देते, तर IR-8 हे प्रति हेक्टर सात टन भाताचे उत्पन्न देते. आज या घटनेला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत.

या तांदळाची लागवड प्रथम 1966 साली फिलीपिन्स मध्ये  करण्यात आली होती. IRRI ही मुळची फिलीपिन्स मधील कृषि संशोधन संस्था आहे. फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर फाउंडेशन हे संस्थापक आहेत. तर मुख्यालय लॉस बॅनोस, लागुना, फिलीपिन्स मध्ये आहे.

IR-8 ची पार्श्वभूमी

भारतासह बहुतेक आशियायी देशांमध्ये दुष्काळ चालु असताना, तांदळाची उच्च उत्पादन क्षमतेची वाण विकसित करण्यासाठी सन 1960 मध्ये संशोधनाला सुरुवात करण्यात आली. पीटर जेनिंग्स, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे प्रथम तांदूळ प्रजनक (rice breeder) (1961-67) यांनी यामध्ये नेतृत्वपूर्ण कामगिरी केली. संशोधकांनी चीन, तैवान आणि इंडोनेशिया पासून मिळालेल्या तांदूळ वाणांचे 38 अलग-अलग संकरीत वाण तयार केले.

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, हेन्री एम. बिचेल, जेनिंग्स यांचे सहकारी, यांनी तांदळाच्या डी-जिओ-वू-गेन आणि पेटा या वाणांचे संकरीत स्वरूप म्हणून IR8-288-3 या नव्या वाणाचा विकास केला आणि फिलीपिन्स मध्ये त्याचे परीक्षण केले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यावेळी 88 किलो शुद्ध बियाणांच्या पेरणीपासून 71 टन भाताचे उत्पादन झाले होते. त्यानंतर, 29 नोव्हेंबर 1966 रोजी IRRI ने या नव्या जातीला अधिकृतपणे IR-8 हे नाव दिले आणि जाहीर केले.

हरित क्रांती आणि भारत

फिलीपिन्स मध्ये मिळालेल्या परिणामानंतर, भारत हा मोठया प्रमाणात भात खाणारा देश असल्यामुळे, दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, सन 1967 मध्ये, एन. सुब्बा राव यांनी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा अटचंता मध्ये 2,000 हेक्टर क्षेत्रात IR-8 ची पेरणी केली. हा क्षण म्हणजे भारतामध्ये भात लागवडीमधील क्रांतीचा भाग झाला.

कमी वाढ कालावधी व उच्च उत्पन्न तसेच नायट्रोजन खताला प्रतिसाद देणारे वाण असल्यामुळे IR-8 हे शेतकर्‍यांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. कीटक प्रतिरोधक हे आणखी एक कारण होते. शिवाय, आकाराने खूपच लहान असल्याने, IR8 हे वाराधून परिस्थितीत उभे राहू शकत होते. IR-8 हे फक्त 105 दिवसांत कापणीसाठी तयार होते.

त्यानंतर, भारतीय शास्त्रज्ञांनी IR-20, IR-36, आणि IR-50 असे अनेक वाण विकसित केले आहे.

भारत आणि फिलीपिन्स मधील,  यशानंतर डॉ. जेनिंग्स यांनी युद्धाने ग्रासलेल्या व्हिएतनाम मध्ये याची लागवड करण्यात आली. व्हिएतनाम मध्ये याला कौतुकाने "होंडा राइस" असे म्हणतात, कारण याच्या उच्च उत्पादन क्षमतेमुळे शेतकऱ्यांना पैसे कमावता आले. ज्यामधून त्यांनी होंडा मोटारसायकल घेण्यास सुरू केले होते.

हवामानातील बदलाचा उत्पन्नावर परिणाम

2010 साली, फील्ड क्रॉप्स रिसर्च जर्नल कडून प्रकाशित अभ्यासामधून हे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे, IR-8 च्या उत्पादन क्षमतेत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. गरम रात्री, वारंवार येणारे पुर आणि प्रदूषण हे यासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...