Tuesday 5 April 2022

जागतिक हिमोफिलिया दिन: 17 एप्रिल🎯

🎯जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) यांच्या नेतृत्वात रक्तस्त्राव विकाराने ग्रसित समुदायाद्वारे 17 एप्रिल 2020 रोजी जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो.

🎯उद्दीष्ट: शरीराच्या काही भागांमधून किंवा नाकपूड्यामधून अचानकपणे रक्तस्त्राव होण्याच्या विविध विकारांविषयी जागृती पसरवणे हे या दिवसाचे आहे.

🎯2020 या वर्षाची संकल्पना: यंदा हा दिन ‘गेट+इनवॉल्व्ड व्हर्चूयली अँड स्टे सेफ’ या संकल्पनेखाली पाळण्यात आला. 

◾️पार्श्वभूमी

🎯फ्रँक शॅनाबेल यांच्या जयंतीनिमित्त जागतिक हिमोफिलिया दिन पाळतात. फ्रँक शॅनाबेल हे एक उद्योगपती होते, जे गंभीर हिमोफिलिया घेऊन जन्मले होते.

🎯जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) याची स्थापना 1963 साली फ्रँक शॅनाबेल यांनी केली होती. संस्थेचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे आहे.

🎯जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) कडून रक्तस्त्रावाचा विकार असलेल्या लोकांचे निदान आणि उपचार पद्धती मोठ्या प्रमाणात सुधारण्यासाठी ग्लोबल अलायन्स फॉर प्रोग्रेस (DAP) कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

◾️हिमोफिलिया आजार

🎯हिमोफिलिया हा अनुवांशिक आजार आहे. हा आजार अनुवांशिकरित्या पालकांकडुन त्यांच्या मुलांना होतो. गुणसुत्रांतल्या दोषांमुळे हा आजार होत असुन आईकडुन मुलाला किंवा मुलाला गर्भावस्थेपासुन होण्याची शक्यता असते.

🎯हिमोफिलियाचे दोन प्रकार आहेत - हिमोफिलिया A (क्लोटिंग फॅक्टर 8 याच्या कमतरतेमुळे दर 5000 पुरुषांपैकी एकाला होतो) आणि हिमोफिलिया B (क्लोटिंग फॅक्टर 9 याच्या कमतरतेमुळे दर 30000 पुरुषांपैकी एकाला होतो).

🎯क्लोटिंग फॅक्टरच्या कमतरतेमुळे जखम झाल्यानंतर रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद असते आणि अधिक काळ उस्फुर्तपणे रक्तस्त्राव होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...