Thursday, 31 March 2022

युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट ; WHO ने देखील व्यक्त केली भीती.

🌸युक्रेनमध्ये युद्धादरम्यान एक नव संकट निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. युक्रेनमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे की, कीव्हसह इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते. डब्ल्यूएचओच्या मते, युक्रेनमध्ये ६०० रुग्णालये आहेत. तेथे अजूनही १७०० करोनाचे रुग्ण दाखल आहेत.

🌸डब्ल्यूएचओने आपल्या असेही म्हटले आहे की, करोना रुग्णांव्यतिरिक्त युक्रेनमधील नवजात, गर्भवती महिला आणि वृद्धांनाही वेळोवेळी ऑक्सिजनची गरज भासू शकते. युद्धाच्या काळात लोकांच्या मनस्थितीवर परिणाम झाल्याने परिस्थितीही चिंताजनक बनली आहे.

🌸कठीण परिस्थितीमुळे तेथील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जवळपास संपला आहे. ऑक्सिजन जनरेटर प्लांटमधून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत.

🌸रशियाने युक्रेनवर सुरू केलेल्या हल्ल्यांचा आजचा पाचवा दिवस आहे. देशभरात आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णालयांवर म्हणजेच आरोग्य सेवांवरही गंभीर संकट निर्माण झाले आहे. तसेच रुग्णवाहिकेतून रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना त्यांच्यावर गोळीबार होण्याचा धोकाही वाढला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...