Thursday, 3 March 2022

धर्म सभा (Dharma Sabha)

🔸 स्थापना :-1830
🔸 संस्थापक :- राधाकांता देब
🔸 ठिकाण :- कोलकाता
🔸 धर्मसभा ही परंपरावादी हिंदू समाज होता.

🔷 कार्य :-

1⃣ या समाजाने समाजाच्या उदारमतवादी आणि मूलगामी सुधारणांचा निषेध केला उदा.सती प्रथा रद्द करणे इ.

2⃣धर्मसभेने हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा,1856 विरुद्ध मोहीम चालवली.

3⃣ या संघटनेची स्थापना प्रामुख्याने राजा राममोहन रॉय आणि हेन्री डेरोजिओ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सामाजिक सुधारणा चळवळींना तोंड देण्यासाठी करण्यात आली.

4⃣ संस्थेने लवकरच 'हिंदू जीवनशैली किंवा संस्कृतीच्या रक्षणासाठी समाज' मध्ये रूपांतर केले जे नंतर RSS साठी Think Tank बनले.

🔷 वृत्तपत्र :- समाचार चंद्रिका हे साप्ताहिक वृत्तपत्र
🔸 स्थापना :- 1822 मध्ये
🔸 संस्थापक :-भाबानी चरण बंदोपाध्याय
🔸 उद्देश :- हे धर्म सभेचे सनातनी हिंदू वृत्तपत्र होते.

No comments:

Post a Comment