१. दुर्गाबाई कामत:- भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री. दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’ (१९१३) या चित्रपटात पार्वतीचे काम केले होते. त्यांची कन्या कमलाबाई कामत (विवाहोत्तर- कमलाबाई गोखले) यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.
२. डॉ. अबन मिस्त्री:- देशातील पहिल्या महिला तबला वादक.
३. सुरेखा यादव:- पहिल्या महिला
रेल्वे चालक.
४. भाग्यश्री ठिपसे:- पाच वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेत्या.
५. हर्षिणी कण्हेकर:- पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी.
६. शिला डावरे:- पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक.
७. आमदार डॉ. भारती लव्हेकर:- देशात पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरू केली.
८. अरुणाराजे पाटील:- भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या तंत्रज्ञ
९. डायना एडलजी:- महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कप्तान.
१०. स्नेहा कामत:- देशातील पहिली वाहन चालन प्रशिक्षण संस्था स्थापन केली.
११. रजनी पंडित:- देशातील पहिल्या नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर.
१२. स्वाती पिरामल:- असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा.
१३. डॉ. इंदिरा हिंदुजा:- देशातील पहिल्या टेस्टटय़ूब बेबीची प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ.
१४. उपासना मकाती:- अंधांसाठी देशातील पहिले जीवनशैलीविषयक मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित केले.
१५. तारा आनंद:- डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून दिला.
No comments:
Post a Comment