Monday, 28 March 2022

इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

इंदिरा गांधी(जन्म : १९ नोव्हेंबर १९१७; - ३१ ऑक्टोबर १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.

इंदिरा गांधी
Indira Gandhi in 1967.jpg
भारतीय पंतप्रधान
कार्यकाळ
जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९६७
राष्ट्रपती
सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला, वराहगिरी वेंकटगिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद
मागील
गुलझारीलाल नंदा
पुढील
मोरारजी देसाई
भारतीय पंतप्रधान
कार्यकाळ
ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९
मागील
एम.सी. छागला
पुढील
दिनेश सिंह
भारताचे गृहमंत्री
कार्यकाळ
जून २६ इ.स. १९७० – फेब्रुवारी ४ इ.स. १९७३
मागील
मोरारजी देसाई
पुढील
यशवंतराव चव्हाण
भारतीय परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
जानेवारी १४ इ.स. १९८० – जानेवारी १५ इ.स. १९८२
भारतीय पंतप्रधान
कार्यकाळ
मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४
राष्ट्रपती
नीलम संजीव रेड्डी
झैलसिंग
मागील
चौधरी चरण सिंग
पुढील
राजीव गांधी
जन्म
नोव्हेंबर १९, इ.स. १९१७
मोगलसराई
मृत्यू
ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४
नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती
फिरोज गांधी
अपत्ये
राजीव गांधी आणि संजय गांधी
निवास
१ सफदरजंग रोड, नवी दिल्ली
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.

इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वांतंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्रसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी पंतप्रधान म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.

१९७५ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८०पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८०च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...