Thursday, 17 March 2022

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 सिक्किम राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈गंगटोक.

💐 सूर्यमालेतील लाल ग्रह कोणता आहे ?
🎈मंगळ.

💐 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणत्या व्हाॅईसराॅयला म्हणतात ?
🎈लाॅर्ड रिपन.

💐 चुलिया धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
🎈मध्यप्रदेश.

💐 महाराष्ट्रातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत कोणती आहे ?
🎈अकलूज.( सोलापूर )

💐 बांबू ही कोणत्या जातीची वनस्पती आहे ?
🎈गवताच्या जातीची.

💐 भेंडीची संकरीत जात कोणती ?
🎈मधुमालती.

💐 तंबाखूचा वापर कशासाठी करतात ?
🎈उत्तेजक म्हणून.

💐 सजीव व निर्जीव यातील दुवा कोणास संबोधले जाते ?
🎈जीवाणूस.

💐 मका ही वनस्पती कशी आहे ?
🎈स्वयंजीवी.

💐 सागरी तसेच तपकिरी शेवाळमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ?
🎈आयोडीनचे.

💐 कोयनेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळते ?
🎈सालीपासून.

💐 हायड्रोग्राफी हे शास्ञ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
🎈जलवनस्पती.

💐 एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात ?
🎈बुंद्यावरील वलये मोजून.

💐 आल्याचा खाण्यास योग्य भाग कशापासून मिळतो ?
🎈खोडापासून.

💐 द्विदल वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू असतात ?
🎈सहजीवी.

💐 कोणत्या पिकाच्या मुळांवर गाठी असतात ?
🎈हरभरा.

💐 एका झाडाच्या अन्नरसावर जगणा-या दुस-या झाडास काय म्हणतात ?
🎈परजीवी.

💐 बहुतेक वनस्पतींना त्यांचे बरेचसे अन्न कशाद्वारे मिळते ?
🎈सूर्यप्रकाशाद्वारे.

💐 दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
🎈प्राणवायू. ( ऑक्सिजन )

💐 हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈चंदीगड.

💐 अथिरापल्ली धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
🎈चालकुंडी नदी.

💐 सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈सांगली.

💐 नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈गोदावरी.

💐 मुलींसाठी राजश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
🎈राजस्थान.

💐 मानवी शरीरात एकूण किती इंद्रीय संस्था कार्यरत असतात ?
🎈नऊ.

💐 सायनोसाटिस हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवांशी संबंधित आहे ?
🎈नाक.

💐 खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
🎈क्षय.

💐 विषमज्वराच्या आजारात कोणते औषध दिले जाते ?
🎈क्लोरोमायसीटिन.

💐 बहुधा दुधातून पसरणारा रोग कोणता ?
🎈कावीळ.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...