🟠रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.
🟡केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून ते युक्रेनमधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते.
🟠पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना सिंग पुढे म्हणाले, तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी याबाबतीत दूरदृष्टीने विचार करत आहेत. त्यामुळे ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत. सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं.
No comments:
Post a Comment