Sunday, 20 March 2022

महत्त्वाचे प्रश्न

🔰महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथास प्रस्तावना ....... यांनी दिली आहे? - बाबा पद्मनजी

❇️'सत्यवादी' व 'कुटुंबमित्र' चे संपादन यांनी केले? - बाबा पद्मनजी

🔰सन १८८२ मध्ये पुण्यात फीमेल हायस्कूलच्या स्थापनेत ... यांचा सहभाग होता? - न्या. म. गो. रानडे

🔰३१ डिसेंबर १८६७ रोजी प्रार्थना समाजाची स्थापना ...... यांच्या घरी झाली?
- डॉ. आत्माराम पां. तर्खडकर

🔰वेद, शास्त्र, पुराणे यांच्या आधारे विधवा विवाहास शास्त्राचा आधार असल्याचे...... यांनी स्पष्ट केले.
- न्या. म. गो. रानडे

🔰हितवादीमध्ये यांनी लेखन केले?
- गोपाळ कृष्ण गोखले.

🔰सन १८९० मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते.
- न्या. म. गो. रानडे

🔰विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला ते कोण?
- डॉ. रा. गो. भांडारकर

🔰इंडियन स्पेक्टेटर नावाचे साप्ताहिक आणि नितीविनोद हा ग्रंथ त्यांनी लिहिला ते ओळखा.
- डॉ. बेहरामजी मलबारी.

🔰बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधात यांनी कार्य केले. त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जाते. - डॉ. बेहरामजी मलबारी.

🔰विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव ...... या सुधारकांवर होता. - गो. ग. आगरकर

🔰विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना ..... यांनी केली.
गो. ग. आगरकर.

🔰समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र यांनी सुरु केले.
महर्षी धोंडो केशव कर्वे (समता संघ १९४४)

🔰'लुकिंग बॅक' हे आत्मवृत्त कोणाचे आहे? - महर्षी धोंडो केशव कर्वे

🔰'माझी साक्ष' हे आत्मवृत्त
यांचे आहे. - पंडिता रमाबाई.

🔰स्त्री धर्मनिती व उच्चवर्णीय हिंदू स्त्री च्या लेखिका .....? - पंडिता रमाबाई

🔰सन १९०४ च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष ...... हे होते? - सयाजीराव गायकवाड.

🔰महात्मा फुलेंच्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तक प्रकाशनास ..... यांनी मदत केली होती?
- सयाजीराव गायकवाड.

🔰अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी
गेले. - वि. रा. शिंदे.

🔰'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र कोणाचे आहे? - वि. रा. शिंदे.

🔰'सिद्धांत विजय' या ग्रंथाचे लेखन ...... यांनी केले. -छ. शाहू महाराज.

🔰छ. शाहूंना राजर्षी ही पदवी यांनी दिली. - कुर्मी क्षत्रिय परिषद.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...