Friday, 25 November 2022

संविधान सभेचे कामकाज


–९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली. या बैठकीला २११ सदस्य हजर होते. जेष्ठतम असलेल्या डॉ. सच्चितानंद सिन्हा यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

-११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष व H C मुखर्जी यांची उपाध्यक्षम्हणून निवड करण्यात आली.

-B N राव यांची नेमणूक संविधान सभेचेकायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली.

–१३ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरूयांनी संविधान सभेत ‘उद्देशपत्रिका‘ मांडली व २२ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला.

*महत्वाचे मुद्दे:*

– मे १९४९ मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले.

– २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.

– २४ जानेवारी १९४७ रोजी संविधान सभेत भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान  स्वीकृत केले.

– २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत २६ जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

Just for revision

GEM (Gender Empowerment Measure) सुरू - 1995 बंद - 2010 3 आयाम 1. राजकीय सहभाग 2. आर्थिक सहभाग + निर्णयप्रक्रिया  3. आर्थिक स्त्रोतांवरील मा...